IMPIMP

Key Steps For Invest Money | ‘गोल बेस्‍ड इन्व्हेस्टिंग’ काय आहे? सहज पूर्ण होतील टार्गेट आणि मिळेल दमदार रिटर्न

by sachinsitapure

नवी दिल्ली : What Is Goal Based Investing | जीवनात सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी विचारपूर्वक प्लानिंग करणे आणि नियमानुसार बचत करणे आवश्यक आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे सुद्धा आवश्यक आहे. या सर्व बाबतीत तुमची टार्गेट बेस्ड सेव्हिंग होते. (Key Steps For Invest Money)

प्रॉपर्टी, म्‍युच्युअल फंड अथवा गोल्ड कशातही बचत होऊ शकते. यासाठी रक्कम काढताना महागाई आणि प्रत्येक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी याचा विचार केला पाहिजे. या दोन्ही गोष्टी ठरवतील की, तुमचे किती पैसे सेव्ह करायचे आहेत. आपले लक्ष्य ठरवल्यानंतर तुम्ही हिशोब करा की यासाठी तुम्हाला किती पैसे लागणार आहेत. हे जाणून घेण्यासाठी महागाई आणि प्रत्येक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी ओळखावा लागेल.

गोल बेस्‍ड इन्व्हेस्‍टमेंट स्‍कीमवर करा फोकस

पॉलिसीबाजारचे इन्व्हेस्टमेंट हेड विवेक जैन म्हणतात की, स्वप्नातील घर खरेदी करायचे असेल अथवा मुलांच्या शिक्षणासाठी बचत करायची असेल अथवा निवृत्तीची योजना करत असाल, यासाठी गोल बेस्‍ड इन्व्हेस्‍टमेंट स्‍कीमवर फोकस केला पाहिजे. उदाहरणार्थ जर तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी निवृत्तीची योजना सुरू करत असाल आणि पुढील २५ वर्षात दर महिन्याला २०,००० रुपये वेगळे काढू शकत असाल तर बाजाराशी संबंधित प्रॉडक्टमध्ये ऐव्हरेज १२% रिटर्नवर तुम्ही निवृत्तीसाठी ३.८ कोटी रुपयांपर्यंत जमा करू शकता. गोल बेस्‍ड इन्व्हेस्‍टमेंट करताना खाली दिलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवा –

लक्ष्य ओळखून प्राथमिकता ठरवा

सर्वप्रथम, आपल्या सर्व फायनान्शियल गोल्‍सची यादी तयार करा. नंतर हे गोल त्यांचे महत्व आणि तात्काळ गरजेनुसार प्राथमिकता ठरवा. यातून, तुमचे पैसे कुठे लावायचे हे समजेल.

लक्ष्यानुसार आवश्यक रक्कमेचा हिशोब

प्रत्येक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी किती पैशांची गरज आहे, हे ठरवावे लागेल. यासाठी महागाई आणि तुमचे टार्गेट पूर्ण होण्यास लागणारा कालावधी या दोन्ही गोष्टी विचारात घ्या.

टार्गेटनुसार योग्य गुंतवणूक करा

प्रत्येक टार्गेट पूर्ण होण्यास लागणारा कालावधी आणि त्यामधील जोखमीच्या आधारावर पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवला पाहिजे. लवकर पूर्ण होत असलेल्या लक्ष्यासाठी कमी जोखमीची गुंतवणूक योग्य ठरते, तर दूरच्या लक्ष्यासाठी जास्त जोखीम घेऊ शकता.

लक्ष्यासाठी योग्य गुंतवणूक पद्धत निवडा

प्रत्येक लक्ष्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पैसा लावणे फायद्याचे ठरते. लवकर पूर्ण होत असलेल्या लक्ष्यासाठी कमी जोखमीच्या गुंतवणूक पद्धती निवडू शकता. जसे की फिक्स्ड डिपॉझिट, कमी कालावधीचे बॉन्ड्स, अथवा लिक्विड फंड्स इत्यादी. तर दूरची लक्ष्य पूर्ण करण्यासाठी थोडी जास्त जोखीम घेऊ शकता, म्यूच्युअल फंड्स अथवा ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता.

रेग्युलर रिव्ह्यू करा आणि रिबॅलन्स करा

वेळोवेळी आपले लक्ष्य आणि इन्व्हेस्टमेंटवर लक्ष ठेवा. गरजेनुसार, गुंतवणूक रिबॅलन्स करा.

ऑटोमेटिक इन्व्हेस्टमेंट

पगारातून इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये ऑटोमेटिक पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा सुरू करा. याचा फायदा असा होईल की, लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सतत पैसे जमा करत रहाल. सोबत प्रत्येकवेळी ताण घ्यावा लागणार नाही.

गुंतवणुकीच्या बाबतीत काटेकोर रहा

जे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कराल त्याबाबतीत काटेकोर रहा. याचा अर्थ पगार आल्यानंतर सर्वप्रथम गुंतवणूक करा, बाजारात जरी चढ-उतार असेल. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका.

गुंतवणुकीवर सतत लक्ष ठेवा

गुंतवणूक करताना सतर्क राहावे लागेल. हे पहात राहा की, वेगवेगळ्या लक्ष्यासाठी केलेली गुंतवणूक कशाप्रकार कामगिरी करत आहे. गरज भासल्यास गुंतवणूक धोरणात बदल करा.

आवश्यक वाटेल तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला

जर तुम्हाला काही गोष्टी समजत नसतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला लक्ष्य आणि जोखीमीच्या हिशोबाने एक स्पेशल इन्व्हेस्टमेंट प्लान बनविण्यास मदत करू शकतील.

Related Posts