IMPIMP

Leena Nair | एकेकाळी ट्रेनी असलेल्या भारतीय वंशाच्या लीना नायर बनणार फ्रान्सच्या सर्वात मोट्या कंपनीच्या सीईओ

by nagesh
Leena Nair | leena nair now lead french brand chanel as global ceo quits unilever chro

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Leena Nair | जगभरातील मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये भारतीयांची संख्या वाढत आहे. FMCG कंपनी युनिलिव्हरच्या चीफ ह्यूमन रिसॉर्सेज ऑफिसर लीना नायर (unilever human resources officer leena nair) आता फ्रान्सच्या लक्झरी कंपनी चॅनेलच्या (Chanel) ग्लोबल CEO पदाची जबाबदारी (Chanel global CEO) स्वीकारणार आहेत. त्यांनी यूनिलीवर येथे एचआर पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, लीना मूळच्या महाराष्ट्रातील कोल्हापूरची (Kolhapur, Maharashtra) आहे. (Leena Nair)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

सुवर्णपदक विजेती लीना नायर –

महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून (holy cross convent school) शालेय शिक्षण घेतलेल्या लीना नायरने सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (walchand college of engineering sangli) पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने जमशेदपूरच्या झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट xavier school of management jamshedpur (XLRI) येथून एमबीए केले आहे. लीना हि तिच्या बॅचची सुवर्णपदक विजेती होती.

 

ट्रेनिंग ते CHRO पर्यंतचा प्रवास –

लीनाच्या (Leena Nair) प्रवासाची सुरुवात सर्वांना प्रेरणा देते. लीनाने 1992 मध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2016 पर्यंत ती या कंपनीत CHRO पदावर पोहचली. त्याचबरोबर यूनिलीवरचा राजीनामा दिल्यानंतर तिने सोशल मीडियावर लिहिले की, मी यूनिलीवरमध्ये काम केले याचा मला नेहमीच अभिमान वाटेल. मला इथे खूप प्रेम आणि आदर मिळाला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

2013 मध्ये लंडन शिफ्ट –

53 वर्षीय लीना नायर यांनी लिहिले की चॅनेल (Chanel) ही एक प्रतिष्ठित कंपनी आहे. त्यामध्ये काम करणे हि एक मोठी गर्वाची गोष्ट आहे. 2013 मध्ये भारतातून लंडनमध्ये स्थलांतरित झालेल्या लीनाचा गेल्या महिन्यात फॉर्च्यून इंडियाने मोस्ट पावरफुल वुमेन लिस्टमध्ये समावेश केला होता. चॅनेल जॉईन केल्यानंतर लीनाने सोशल मीडियावर मिळणाऱ्या शुभेच्याबद्दल सर्वांचे आभार मानले. प्रत्येकाला उत्तर देणे अवघड आहे,पण मी प्रत्येकाची कंमेंट वाचत आहे. तसेच मी सर्वांचे आभार मानते.

 

चॅनेलची ग्लोबल सीईओ (Chanel global CEO) बनल्यानंतर, लीना नायर त्या भारतीयांच्या यादीत सामील झाली आहे
ज्या भारतीय वंशाच्या असून जगातील सर्वात मोठ्या कंपनीला लीड करत आहेत.
नुकतेच भारतीय वंशाचे पराग अग्रवाल (parag agarwal) ट्विटरचे (twitter) नवे सीईओ बनले आहेत.
याआधी गुगलचे (googel) सुंदर पिचाई (sundar pichai), मायक्रोसॉफ्टचे (microsoft) सत्या नडेला (satya nadella)
आणि पेप्सिकोच्या (pepsico) इंद्रा नूयी (indra nooyi) यासारखी भारतीय नावे जगभर आपली चमक पसरवत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Leena Nair | leena nair now lead french brand chanel as global ceo quits unilever chro

 

हे देखील वाचा :

IPS Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस रश्मी शुक्लांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Rajkummar Rao | राजकुमार रावच्या नवीन नवरीने बिकमीमध्ये केली मस्ती, तर राजकुमार रावने…

Bigg Boss 15 | ‘तिकीट टू फिनाले’ टास्कमध्ये राखी सावंतवर संतापला तिचा पती रितेश, म्हणाला असं काही की…

 

Related Posts