IMPIMP

LIC Dhan Rekha Plan | ‘एलआयसी’नं आणला नवीन ‘धन रेखा प्लॅन’ ! जाणून घ्या या मनी बॅक योजनेचे वैशिष्ट्य

by nagesh
LIC Unclaimed Money | lic have 20000 crores of unclaimed money this amount is more than the market cap of 5 companies of tata group

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC Dhan Rekha Plan | भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) मार्केटमध्ये असा प्लान आणला आहे, जो मनी बॅकसह 100 टक्के मॅच्युरिटी देतो. एलआयसीने हा प्लान धन रेखा नावाने लाँच केला आहे. या प्लानचे वैशिष्ट्य असे आहे की, आता तुम्हाला 125 टक्के सम अ‍ॅश्युअर्ड मिळतो. याशिवाय यामध्ये दोन प्रकारे प्रीमियम जमा करण्याचा ऑप्शन दिला जातो. यामध्ये सिंगल आणि मर्यादित प्रीमियम भरण्याचा पर्याय आहे. हे मनी बॅक (Money Back) शेयर मार्केटशी लिंक नाही, यामुळे जोखीम सुद्धा कमी आहे. (LIC Dhan Rekha Plan)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

एलआयसी धन रेखा पॉलिसी
LIC धन रेखा पॉलिसी (LIC Dhan Rekha Policy) आज 13 डिसेंबर 2021 रोजी लाँच करण्यात आली आहे. तिचा प्लान नंबर 863 असेल. हा प्लान
आजच्यासाठी लाभदायक ठरू शकतो, कारण असा प्लान अजूनपर्यंत एलआयसीद्वारे देण्यात आला नव्हता.

 

एलआयसी धन रेखा पॉलिसी एक मनी बॅक प्लान आहे, जी एक नॉन लिंक्ड मनी बॅक पॉलिसी आहे आणि यामध्ये मनी बॅकशिवाय अखेरीस गॅरंटेड
अ‍ॅडीशन बोनस सुद्धा दिला जातो. यामध्ये विमा रक्कम 2 लाख किमान दिली जाते आणि कमाल तुम्ही कितीही घेऊ शकता.

 

पॉलिसीचा कालावधी
एलआयसी धन रेखा पॉलिसी तीन वेगवेगळ्या कालावधीसोबत आणली गेली आहे. ती 20 वर्ष, 30 वर्ष आणि 40 वर्ष कालावधीसह आणली आहे. यापैकीच तुम्ही एक कालावधी निवडू शकता. या अंतर्गत प्रीमियम भरावा लागतो. जर तुम्ही 20 वर्षाचा कालावधी निवडला तर तुम्हाला 10 वर्षापर्यंत प्रीमियम द्यावा लागेल.

 

30 वर्षाचा कालावधी निवडला तर 15 वर्षापर्यंत प्रीमियम भरावा लागेल आणि जर तुम्ही 40 वर्षाचा कालावधी घेतला तर 20 वर्षापर्यंत प्रीमियम द्यावा लागेल. याशिवाय सिंगल प्रीमियमचा भरणा करून सुद्धा प्रीमियम देऊ शकता. महिलांना विशेष दरावर प्रीमियम द्यावा लागतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

केव्हा आणि कसे मिळते मनी बॅक
20 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला 2 वेळा मनी बॅक मिळेल आणि हे विमा रक्कमेच्या 10 टक्के असेल.
20 वषाच्या कालावधीत 10 वर्ष आणि 15 वर्ष पूर्ण केल्यानंतर मनी बॅक देते.
हे मनी बॅक तुमच्या विमा रक्कमेच्या 20 टक्के असेल.

 

अशाप्रकारे 30 वर्षाच्या कालावधीवर 3 वेळा मनी बॅक मिळेल,
जे विमा रक्कमेच्या 15 टक्के असेल, जे 15, 20 आणि 25 व्या वर्षी दिले जाईल.
याशिवाय 40 वर्ष कालावधीत 4 वेळा मनी बॅक मिळेल जे 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष आणि 35 वे वर्ष संपल्यावर दिले जाईल.

 

मॅच्युरिटी आणि मृत्यु लाभ
जर एखाद्याचा पॉलिसी कालावधीत म्हणजे टर्मच्या आतच मृत्यू झाला तर विमा रक्कमेच्या 125% बोनससह नॉमिनीला दिले जातील.
तर मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर विमाधारकाला 100 टक्के मनी बॅकसह दिले जाते. यामध्ये मनी बॅक 100 टक्के मॅच्युरिटीत धरले जात नाही.

 

कोण घेऊ शकतात पॉलिसी
या पॉलिसी अंतर्गत 40 वर्षाच्या टर्मसाठी कमाल वय 55 वर्ष आणि किमान वय 90 दिवस आहे.
30 वर्ष टर्मसाठी कमाल वय 45 वर्ष आणि किमान 2 वर्ष आहे. तर 20 वर्ष टर्मसाठी कमाल वय 35 वर्ष आणि किमान 3 वर्ष आहे.
या अंतर्गत येणारा कुणीही भारतीय व्यक्ती पॉलिसी घेऊ शकतो.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- LIC Dhan Rekha Plan | lic brought new dhan rekha plan know what are the features of this money back plan

 

Indian Soldier Suicide | खळबळजनक ! लष्करी कॅम्पमध्ये संदीप शिंदे यांची स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या, दोनच दिवसांपुर्वी मेजरनं केलं होतं ‘सुसाईड’

Nawab Malik | ‘देवेंद्र फडणवीस टीका करतात तेव्हा चमत्कार घडतो, 2024 मध्ये देखील…’

Easy Way to Protect Omicron | भारतीय तज्ज्ञांनी सांगितली कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनपासून बचावाची सर्वात सोपी पद्धत, जाणून घ्या

 

Related Posts