IMPIMP

LIC पॉलिसी होल्डर ज्यांना करायची आहे LIC IPO मध्ये गुंतवणूक, जाणून घ्या ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी

by nagesh
Tamilnad mercantile bank ipo opens next week check price band lot size and other details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC IPO | भारतीय आयुर्विमा महामंडळाचा Life Insurance Corporation of India (LIC) आयपीओ 4 मे रोजी लाँच होणार आहे. या आयपीओद्वारे सरकार LIC मधील 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे. आयपीओ किंमत 902 – 949 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. ही किंमत अँकर गुंतवणूकदारांसाठी असेल. आयपीओ उघडण्यापूर्वी अँकर गुंतवणूकदारांना संधी दिली जाईल. अँकर गुंतवणूकदार 2 मे पासून बोली लावू शकतील. (LIC IPO)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एलआयसी पॉलिसीधारकांना (LIC Policy Holders) आयपीओमध्ये बोली लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना प्रति शेअर 60 रुपये सूट दिली जाईल. कंपनीच्या कर्मचार्‍यांनाही आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात असून त्यांना प्रति शेअर 45 रुपये सूट मिळणार आहे. इतकेच नाही तर किरकोळ गुंतवणूकदारांना 40 रुपयांची सूटही दिली जाणार आहे. (LIC IPO)

 

एलआयसीचे पॉलिसीधारक, ज्यांना या आयपीओमध्ये गुंतवणूक (Investment In LIC IPO) करायची आहे, त्यांनी यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही तथ्ये जाणून घेतली पाहिजेत. कारण सरकारने पॉलिसीधारकांसाठी काही अटी घातल्या आहेत. या अटींची पूर्तता करणारा पॉलिसीधारकच पॉलिसीधारक श्रेणीतील आरक्षित शेअर्ससाठी (LIC IPO Share) बोली लावू शकतो.

 

1. एलआयसी पॉलिसी डेट (LIC Policy Date) :

एलआयसीच्या आयपीओमध्ये, फक्त ते पॉलिसीधारक पॉलिसीधारकांसाठी राखीव असलेल्या शेअर्ससाठी बोली लावू शकतात, ज्यांनी 13 फेब्रुवारी 2022 पर्यंत पॉलिसी खरेदी केली आहे. ज्यांनी 13 फेब्रुवारीनंतर पॉलिसी खरेदी केली आहे ते आरक्षित कोट्यावर बोली लावण्यास पात्र नाहीत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2. पॉलिसीसोबत पॅन लिंक (PAN Link With The LIC Policy) :

पॉलिसीधारकांसाठी राखीव असलेल्या 10% कोट्याचा लाभ फक्त त्या एलआयसी पॉलिसीधारकांना मिळू शकतो ज्यांची पॉलिसी त्यांच्या पॅन कार्डशी लिंक केली आहे. एवढेच नाही तर 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पॉलिसी पॅनशी लिंक करणे आवश्यक आहे. 28 फेब्रुवारीनंतर ज्यांनी आपली पॉलिसी पॅनशी लिंक केली आहे ते देखील आरक्षित कोट्यात अर्ज करू शकत नाहीत.

 

3. जॉईंट पॉलिसी (Joint Policy) :

जॉईंट पॉलिसीधारकांपैकी कोणताही एक पॉलिसीधारक राखीव असलेल्या 10% कोट्याच्या लाभासाठी अर्ज करू शकतो. फक्त एकच अर्ज करता येईल याची कृपया नोंद घ्यावी. दोन्ही जॉईंट पॉलिसीधारक स्वतंत्रपणे अर्ज करून याचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

 

4. कोण करू शकतात अर्ज :

पॉलिसीधारक श्रेणीतील ग्रुप पॉलिसीधारक आणि एलआयसी पॉलिसीधारक अनिवासी भारतीय (एनआरआय) वगळता सर्व पॉलिसीधारक अर्ज करू शकतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

5. लॅप्स्ड पॉलिसी (Lapsed LIC Policy) :

ज्यांची एलआयसी पॉलिसी संपली आहे त्यांनाही पॉलिसीधारकांच्या 10% कोट्यामध्ये अर्ज करण्याचा अधिकार आहे.
सर्व पॉलिसीज, ज्या मॅच्युअर्ड, सरेंडर किंवा पॉलिसीधारकाच्या मृत्यूमुळे एलआयसीच्या रेकॉर्डमधून बाहेर काढलेल्या नाहीत,
ते पॉलिसीधारक आरक्षणांतर्गत अर्ज करू शकतात.

 

Web Title :- LIC IPO | lic ipo date price announced 5 things that every policyholders should know

 

हे देखील वाचा :

Balayogi Mahesh Saraswati Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्नजन्मासाठी शिवनेरी ते तुळजापूर 450 किलोमीटरचा टप्पा पार करत घातले दंडवत

PM Svanidhi Yojana | मोदी सरकारचा निर्णय ! पीएम स्वानिधी योजनेला डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ

Pune Crime | ज्युस सेंटरच्या मालकाच्या डोक्यात हातोड्याने घातला घाव; शिवाजीनगर परिसरातील घटनेत मालकाच्या कवटीला इजा

 

Related Posts