IMPIMP

LPG Price Hike | महागाईचा डबल अटॅक ! पेट्रोल-डिझेलने दिला जोरदार झटका, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ

by nagesh
LPG Gas Price | lpg-cylinder-prices-1-september-commercial-gas-reduced-from today

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -LPG Price Hike | गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टीची शक्यता वर्तवली जात होती ती आज झाली आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Hike) आज वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही वाढ कच्च्या तेलातील वाढीमुळे आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 80 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. (LPG Price Hike)

आज सकाळी 6 वाजल्यापासून नवीन किंमती लागू झाल्या आहेत. आजपासून रोज किंमती वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबरला देशात इंधनाचे दर वाढले होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुंबईत पेट्रोल 110.82 रू.

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशनच्या लेटेस्ट अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 22 मार्च 2022 ला पेट्रोलचा दर 109.98 रूपये प्रति लीटरवरून वाढून 110.82 रूपये प्रति लीटरवर पोहचला आहे. तर डिझेलचा दर 95 रूपये प्रति लीटरवर पोहचला आहे.

 

 

दिल्लीत पेट्रोल 96.21 रू.

दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रूपये प्रति लीटरवरून वाढून 96.21 झाली आहे. तर डिझेलचा भाव 86.67 रूपये प्रति लीटरवरून महाग होऊन आता 87.47 रूपयांवर पोहचला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रू.ची वाढ

तसेच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात (LPG cylinder rate) 50 रूपयांची वाढ झाली आहे. नवीन किंमत आज मंगळवारपासून लागू झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर 6 ऑक्टोबर 2021 च्या नंतर वाढला आहे. आजपासून घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमती दिल्लीत 899.50 रूपयांवरून वाढून 949.50 रूपये झाली आहे.

 

Web Title :- LPG Price Hike | lpg price hike lpg domestic gas cylinders price hike by rs 50 per cylinder

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price Hike | महागाईचा भडका ! 4 नोव्हेंबरनंतर पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत प्रथमच वाढ; जाणून घ्या पुण्यातील नवीन दर

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिकेचे प्रशासक विक्रम कुमारांचा अनेक नगरसेवकांसह दिग्गजांना दणका ! मनपाच्या इमारती, वास्तु व जागा वापराबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

Related Posts