IMPIMP

Maharashtra Rains | दिवाळीच्या पाडव्याला राज्यात पावसाच्या सरी, हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

by nagesh
Maharashtra Rains | light to moderate rainfall and cloudy weather possible in konkan and central maharastra on weekend

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्ष्यद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Rains) देखील गेल्या 24 तासात कोकण (Konkan) आणि गोव्यात (Goa) अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात देखील पवसाच्या (Maharashtra Rains) सरी कोसळल्या. हवामान विभागाने (IMD) दक्षिण कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दक्षिणपूर्व अरबी समुद्र व लक्ष्यद्वीपजवळ कमी दाबाच्या क्षेत्राचा विस्तार महाराष्ट्राच्या किनारपट्टी पर्यंत (Maharashtra Coast) आहे.
त्यामुळे शुक्रवारी (दि.5) दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणात रविवारपर्यंत (दि.7) पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (Pune), सातारा (Satara), सांगली (Sangli) आणि कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यात रविवारी (दि.7) मेघगर्जनेसाह तुरळक ठिकाणी पावसाची
(Maharashtra Rains) शक्यता आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यात 5 आणि 6 तारखेला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात उद्या मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन पाऊस (Maharashtra Rains) पडेल.
दुसरीकडे पुण्यात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
परंतु हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | Rain showers in the state on Diwali Padwa, the weather department gave warning

 

हे देखील वाचा :

Sameer Wankhede | वानखेडेंच्या विरोधात दलित संघटना आक्रमक, जात पडताळणी समितीकडे केली तक्रार

Chandrakant Patil | ‘एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार हे हास्यास्पद’ – चंद्रकांत पाटील

Pune Crime | पुण्यात डीएसके ड्रिमसिटीच्या सुरक्षा रक्षकांवर चोरट्यांचा हल्ला!

 

Related Posts