IMPIMP

Maval Lok Sabha Election Result | मावळमधून श्रीरंग बारणेंची आघाडी; वाघेरे 54 हजार मतांनी पिछाडीवर

by sachinsitapure

पुणे : Maval Lok Sabha Election Result | लोकसभा निवडणूक निकाल २०२४ ची मतमोजणी आज होत आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील जनता कुणाच्या बाजूने हे थोड्याच वेळात कळणार आहे. याबाबत नेत्यांकडून विविध दावे करण्यात येत होते.

१ लाख ७० हजार मतांनी वाघेरे (Sanjog Waghere) विजयी होणार तर अडीच लाख मतांनी बारणे (Shrirang Barne) विजयी होणार असा दावा करण्यात आला होता. आज मतमोजणी सुरुवात झाली. १८०० मतांपासून सुरुवातीपासून बारणे यांच्या आघाडीस सुरुवात झाली.

सहाव्या फेरी अखेर ५४ हजार मतांनी बारणे यांनी आघाडी घेतली आहे. पिंपरी, चिंचवड, पनवेल या मतदार या तीन विधानसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना चांगली आघाडी मिळाली आहे. तर कर्जत, उरण आणि मावळ परिसरातून वाघेरे यांना आघाडी मिळत आहे.

शेवटच्या फेरीपर्यंत कोण बाजी मारणार याविषयी उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्रात यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होती. काही मतदारसंघात बंडखोर आणि छोट्या पक्षाचे उमेदवार रिंगणात होते. त्यांचा कुणाला फटका बसला हेही निकालातून स्पष्ट होईल.

Related Posts