IMPIMP

Mazi Bahin Ladki Yojana | मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणी’कडून लाच मागितल्याने तलाठी निलंबित

by sachinsitapure

अमरावती: Mazi Bahin Ladki Yojana | महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ १ जुलैपासून सुरू केली. या योजनेसाठी २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला पात्र असून याकरता एक जुलैपासून तलाठी कार्यालय तसंच शहरी भागात तहसील कार्यालयात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मध्यप्रदेशातील राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यात आली होती. त्याधर्तीवर महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी तलाठी कार्यालयात महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै असल्याने महिला अर्ज करण्यासाठी गर्दी करीत आहेत.

अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. वरुड येथे या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तुळशीराम कंठाळे हा तलाठी चक्क महिलांकडून पैसे वसूल करत असल्याचे समोर आले आहे. महिलांकडून पैसे उकळतानाचा त्याचा व्हिडिओ आणि फोटो देखील व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली.

महिलांकडूनच या योजनेसाठी लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याच्या प्रतापाची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळेच या तलाठ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितले आहे.

Related Posts