IMPIMP

MLA PN Patil Kolhapur | कोल्हापूरमधील काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

by sachinsitapure

कोल्हापूर : MLA PN Patil Kolhapur | कोल्हापुर येथील काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे आज सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७१ वर्षांचे होते. रविवारी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. यामुळे मागील चार दिवसांपासून पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

आज २३ मे २०२४ रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डोक्याला मार लागल्याने त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊन त्यांची प्रकृती खालावत गेली. जिल्हा काँग्रेसच्या माहितीनुसार पाटील यांचे पार्थिव जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सडोली खालसा या त्यांच्या मूळ गावी आज ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी एन पाटील हे काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते. २००४ आणि २०१९ असे दोनदा आमदारपद त्यांनी भूषवले. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९५३ रोजी झाला होता. पाटील हे २००४ मध्ये पाटील पहिल्यांदा सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले.

मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी २००९, २०१४ मध्ये करवीरमधून निवडणूक लढवली पण, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Hadapsar Pune Crime News | पुणे : तरुणीला अश्लील शिवागाळ करुन मारहाण, आरोपीला अटक

Related Posts