IMPIMP

मोबाईल खरेदीनंतर Mobile Insurance काढायला पाहिजे का, येथे जाणून घ्या सर्वकाही

by sachinsitapure

नवी दिल्ली : मोबाईल इन्श्युरंस हा मोबाईलसाठी डिझाईन करण्यात आला आहे. या इन्श्युरंस पॉलिसीमध्ये फोनचे डॅमेज आणि हरवणे अथवा चोरी होणे यासारख्या गोष्टींसाठी कव्हर केले जाते. तुम्ही हा इन्श्युरंस मोबाईल डिव्हाईस स्टोअर अथवा एखाद्या इन्श्युरंस कंपनीच्या वेबसाइट आणि अ‍ॅप्समधून खरेदी करू शकता (What is Mobile Insurance).

मात्र, मोबाईल इन्श्युरंस (Mobile Insurance) घेणे अनिवार्य नाही. जर तुम्ही हा इन्श्युरंस घेतल्यास तो फायनान्शियली सेफगार्डसारखी भूमिका पार पाडतो. तज्ज्ञ सुद्धा सांगतात की मोबाईल इन्श्युरंस घेणे एक स्मार्ट चॉईस असते.

अ‍ॅक्सीडेंट अथवा कोणत्याही कारणामुळे फोन तुटल्यास तो रिपेयर करणे महागात पडते. अशावेळी मोबाईल इन्श्युरंस खुप उपयोगी पडतो. अनेकदा पाणी, मॉयश्चर आणि ह्यूमिडिटीमुळे सुद्धा फोन खराब होतो. या स्थितीला देखील मोबाईल इन्श्युरंस कव्हर करतो. महागडे फोन दुरूस्त करणे खुप महाग पडते.

जर फोन हरवला आणि वॉरंटी पीरियड चालू असेल तरी सुद्धा त्याचे कॅम्पनसेशन मिळत नाही. परंतु, मोबाईल इन्श्युरंसमध्ये पूर्णपणे कॅम्पनसेशन दिले जाते.

मोबाईल इन्शुरन्समध्ये काय-काय कव्हर होते (What will be covered in mobile insurance?)

* फोन चोरीला जाणे.
* दुर्घटनेत फोन डॅमेज होणे.
* लिक्विड डॅमेज कव्हर होते.
* कोणतीही टेक्नीकल समस्या आल्यास.
* स्मार्टफोनची स्क्रीन डॅमेज होणे.
* स्मार्टफोनला आग लागणे.

मोबाईल इन्श्युरंसमध्ये काय कव्हर होत नाही? (What mobile insurance does not cover?)

* फोन कसा हरवला याची माहिती नसणे.
* फोनचे जाणीवपूर्वक नुकसान करणे.
* मालकाशिवाय अन्य व्यक्ती फोनचा वापर करत असेल.
* फोनमध्ये अगोदरच एखादा बिघाड असेल.

मोबाईल इंश्युरंसमध्ये मिळतात या सुविधा

* अनेक इन्श्युरंसमध्ये रिपेयरसाठी डोअरस्टेप पिक-अप आणि ड्रॉप सुविधा मिळते.
* कॅशलेस प्रोसेसची सुद्धा सुविधा मिळते.
* काही इन्श्युरंस कंपन्या नो-क्लेम बोनस सुद्धा देतात.

Related Posts