IMPIMP

MP Navneet Rana | ‘लव्ह जिहाद’वरुन खासदार नवनीत राणा पोलीस ठाण्यात आक्रमक; दोन तासात मुलीचा शोध घ्या, राणांचा पोलिसांना अल्टिमेटम (व्हिडिओ)

by nagesh
MP Navneet Rana | amravati mp navneet rana at raja peth police station inter religion marriage issue

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन अमरावती शहरात आणखी एक लव्ह जिहादचे प्रकरण (Amravati Love Jihad Case) समोर आल्यानंतर
हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा (MP
Navneet Rana) हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यासंह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात (Rajapeth Police Station) दाखल झाल्या आणि मुलीला समोर
आणण्याची मागणी केली. लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी केला आहे. या प्रकरणी मुलीच्या
वडिलांनी फिर्याद (FIR) दिली असून या प्रकरणावरुन नवनीत राणा आणि पोलीस यांच्यात खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप

नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी म्हटले की, पतीने मुलीला डांबून ठेवले असल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले होते. परंतु मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड (Phone Record) केला, तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला. या मुद्यावरुन राणा यांनी पोलीस ठाण्यात आल्या. यादरम्यान पोलीस आणि राणा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण असून पोलिसांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढले आहे. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडत पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.

 

 

दोन तासात मुलीचा शोध घ्या

नवनीत राणा यांनी आरोप करताना म्हटले की, अमरावतीची बदनामी का होत आहे. 19 वर्षांची हिंदू मुलगी (Hindu Girl) आहे. त्या मुलाला पकडून आणलं आहे. रात्रीपासून चौकशी करत आहेत. मात्र काही समोर येत नाही. मुलगी कुठं आहे याबाबत उत्तर दिलं जात नाही. त्या मुलाच्या परिवाराला इथं पकडून आणा, एका तासात सगळं बाहेर येईल, असंही राणा म्हणाल्या. दोन तासांत मुलीचा शोध घ्या, असा अल्टिमेटम पोलिसांना दिला असल्याचे राणा यांनी सांगितले. या मुलांचा एक समूह असल्याचा आरोप राणा यांनी केला आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुलीच्या पालकांनी सांगितले की, माझी मुलगी साडेबारा वाजता बँकेत गेली. परंतु तिचा फोन नंतर बंद झाला. आमच्या घरी तो मुलगा कधीच आला नाही, असं मुलीच्या पालकांनी सांगितलं.

 

 

 

पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी – अनिल बोंडे

भाजप खासदार अनिल बोंडे (BJP MP Anil Bonde) यांनी या प्रकरणाबाबत बोलताना सांगितले की, धारणी आणि अमरावतीची दोन अशी प्रकरणं आहेत. धारणीच्या मुलीला हैदराबादला नेण्यात आले. त्या मुलीने फोन करुन सांगितलं मला अमरावतीला यायचं आहे. धारणी आणि अमरातवतीच्या पोलिसांना मी विनंती केली होती की, त्या मुलींना शोधून सोडवून आणा. पोलिसांनी या प्रकरणामध्ये जेवढं गांभीर्य दाखवायला पाहिजे होते, तेवढे गांभीर्य दाखवले नाही. धारणी मध्ये 20 तर अमरावतीमध्ये 4 प्रकरणं झाली असल्याची माहिती बोंडे यांनी दिली.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  MP Navneet Rana | amravati mp navneet rana at raja peth police station inter religion marriage issue

 

हे देखील वाचा :

Pune Crime | लोहगाव येथे मटका अड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 12 जणांवर कारवाई

Best Multibagger Stock 2022 | शेअर बाजाराच्या वाटचालीवर मात करणारा स्टॉक, वर्षभरात पैसे झाले दुप्पट

Dragon Fruit | ड्रॅगन फ्रुटमध्ये आहे जबरदस्त ताकद, ‘या’ आजारांचा धोका करते कमी

Pune Pimpri Crime | शाळेतून घरी जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग, निगडीतील भेळ चौकातील घटना

 

Related Posts