IMPIMP

MP Supriya Sule | ‘तर मग टेकडी कशी असते?’ खा. सुप्रिया सुळेंचा मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना सवाल (व्हिडीओ)

by nagesh
MP Supriya Sule | supriya sule said other options should be explored without cutting a single tree on the vetal hill

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   – वेताळ टेकडीच्या प्रकल्पाला (Vetal Hill Project) नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. त्याविषयी जाणून घेण्यासाठी
खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मंगळवारी वेताळ टेकडीची पाहणी केली. जनतेचा विरोध होत असेल, तर प्रशासनाने त्याचा विचार
केला पाहिजे. पुण्याचे पर्यावरण (Environment of Pune) वाचविणे आवश्यकच आहे. टेकडीवरील पर्यावरण कमी न करता, एकही झाड न कापता
त्या रस्त्यासाठी इतर पर्याय पाहायला पाहिजे, असे खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सध्या वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्त्याला (Balbharti Road) विरोध होत आहे. त्याबाबत जाणून घेण्यासाठी सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास वेताळ टेकडी येथे आल्या होत्या. त्यांनी कृती समितीच्या सदस्यासोबत रस्ता कुठून जाणार आहे? किती आणि कोणती झाडं तोडली जाणार, याबाबत माहिती घतेली. त्यानंतर वन विभागाच्या कार्य़ालयात जाऊन कृती समितीने (Action Committee) तयार केलेले टेकडीबाबतचे सादरीकरण जाणून घेतले.

 

 

तर मग टेकडी कशी असते?

पुणे महानगरपालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) आयुक्त विक्रम कुमार (Commissioner Vikram Kumar) यापूर्वी म्हणाले होते की, रस्ता होतोय, ती टेकडीच नाही. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, काही लोक म्हणतात, टेकडीवर रस्ता आहे, तर काही लोक म्हणतात टेकडीवर रस्ता नाही. यामध्ये वस्तूस्थिती काय आहे? ते पाहण्यासाठी मी टेकडी पाहण्यासाठी आले. प्रशासनाला वाटत असेल की, ही टेकडी नाही, तर मग मी पाहिली ना ही टेकडीच आहे. त्यांना जर वाटत नसेल की ही टेकडी नाही, तर मग टेकडी कशी असते? असा अप्रत्यक्ष सवाल त्यांनी पालिका आयुक्तांना विचारला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Supriya Sule | supriya sule said other options should be explored without cutting a single tree on the vetal hill

 

हे देखील वाचा :

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन, सिंधुदूर्ग इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !!

Nashik-Jalgaon-Bhusawal ACB Trap | नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : जळगाव- भुसावळ तहसिल कार्यालय – 12 हजाराच्या लाच प्रकरण कोतवालासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – फिनीक्स मॉलमधील स्टोअरमध्ये 20 वर्षीय तरूणीच्या प्रायव्हेट पार्टचे व्हिडीओ शुटिंग करणार्‍याला अटक

 

Related Posts