IMPIMP

Multibagger Stock | 28 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले करोडपती, 1 लाख झाले 1.29 कोटी, तुमच्याकडेही आहे का?

by nagesh
Multibagger Stock | multibagger stock balaji amines share price 28 to rs 3673 1 lakh would have turned to 1 29 cr

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Multibagger Stock | सध्या गुंतवणूकदार शेअर बाजारातून भरपूर कमाई (earning money from stock market) करत आहेत. शेयरधारकांना बंपर रिटर्न (stock return) मिळत आहे. अनेक लहान-मोठ्या शेयर्सने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. आज आम्ही अशाच एका Multibagger Stock बद्दल सांगत आहोत ज्याने 15 वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले. हा शेयर बालाजी अमाईन्स (Balaji Amines) चा आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

होय या केमिकल शेयर (Chemical stock) ची किंमत आता प्रति शेअर 3672.95 रुपये झाली आहे, तर 5 एप्रिल 2007 रोजी त्याची किंमत प्रति शेअर 28.42 रुपये होती. या शेयरमध्ये संयम राखणार्‍या गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न मिळाला आहे.

 

शेअर प्राईस हिस्ट्री
हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या एका महिन्यात सुमारे 3220 रुपयांवरून 3673 रुपयांपर्यंत वाढला आहे, या कालावधीत सुमारे 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत, बालाजी अमाईन्सच्या शेअरची किंमत अंदाजे रू. 2900 वरून रू. 3673 पर्यंत वाढली आहे, त्याच कालावधीत जवळपास 27 टक्के वाढ झाली आहे.

 

गेल्या एका वर्षात या रासायनिक शेयरची किंमत सुमारे 215 टक्क्यांनी वाढून सुमारे रू. 1163 वरून रू. 3673 वर पोहोचली आहे.
त्याचप्रमाणे, गेल्या 5 वर्षात, हा मल्टीबॅगर स्टॉक सुमारे रू. 345 वरून रू. 3673 पर्यंत वाढला आहे आणि 970 टक्क्यांनी वाढला आहे.
त्याचप्रमाणे, गेल्या जवळपास 15 वर्षात, हा मल्टीबॅगर स्टॉक 28.42 रुपयांवरून 3673 रुपयांपर्यंत वाढला आहे. (Multibagger Stock)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले 1.29 कोटी
जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर आज त्याचे 1 लाख 1.14 लाख झाले असते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर केमिकल स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 1 लाखांची गुंतवणूक केली असती तर त्याचे 1 लाख 1.27 लाख झाले असते.

तर गेल्या एका वर्षात ते 1 लाख आज 3.15 लाख झाले असते.

त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 15 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज सुमारे 1.29 कोटी रुपये झाले असते.

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock balaji amines share price 28 to rs 3673 1 lakh would have turned to 1 29 cr

 

हे देखील वाचा :

Pradhanmantri Scholarship Scheme | पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना 2022 : जाणून घ्या ऑनलाइन अर्ज कसा करावा आणि फॉर्मची सविस्तर माहिती

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात मुलींचे फोटो मॉर्फिंग करण्याचा प्रकार उघड, बनवत होता ‘नग्न’ अश्लिल फोटो पोलिसांकडून एकाला अटक

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचं अनिल परबांना आव्हान; म्हणाले – ‘किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दांचा मान राखा’

 

Related Posts