IMPIMP

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात रोखला दुसरा बालविवाह

by nagesh
Nandurbar Police | Nandurbar police prevented second child marriage in just 2 days

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाईन – नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करत अवघ्या 2 दिवसात दुसरा बालविवाह (Child Marriage) रोखला आहे. ऑपरेशन अक्षता हा महत्वकांक्षी उपक्रम दि. 8 मार्च 2023 रोजी सुरू करण्यात आला असून आतापर्यंत नंदुरबार जिल्हयातील 634 ग्रामपंचायतींपैकी 615 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आला आहे. पोलिसांनी दोनच दिवसांपुर्वी शहादा तालुक्यातील प्रकाशा (Prakasha Shahada) येथे होणारा बालविवाह रोखला होता. आता त्यानंतर पोलिसांनी अक्कलकुवा (Akkalakuwa) तालुक्यातील सोरापाडा येथील बालविवाह रोखला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी दिली आहे. (Nandurbar Police)

 

अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे एका अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील एका मुलासोबत आदिवासी रितीरिवाजाप्रमाणे दि. 3 मे 2023 रोजी बालविवाह होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन त्यांनी अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे (Akkalakuwa Police Station) सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावीत (API Rajesh Gavit) यांना बालविवाह रोखण्याबाबत आदेश देवुन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. (Nandurbar Police)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अक्कलकुवा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावीत आणि अक्षता सेलने अधिक माहिती काढली. दि. 3 मे रोजी रात्री विवाह होणार असल्याचे समजले. त्यावेळी त्यांनी मुलीच्या जन्म तारखेबाबत विचारपूस करून आधार कार्डची (Aadhaar Card) मागणी केली. सदरील मुलीचे वय हे 15 वर्ष आणि मुलाचे वय हे 18 वर्ष 10 महिने असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मुलगा आणि मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. अशा पध्दतीने नंदुरबार पोलिसांनी अवघ्या 2 दिवसांमध्ये दुसरा बालविवाह रोखला आहे.

 

पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe),
अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत (SDPO Sambhaji Sawant)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावीत, पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत (PSI Ritesh Raut),
पोलिस उपनिरीक्षक अंकिता बावीस्कर (Ankita Baviskar), पोलिस नाईक सुनिल पवार,
पोलिस अंमलदार पंकज जिरेमाळी यांच्या पथकाने हा बालविवाह रोखला आहे.

 

 

Web Title :-  Nandurbar Police | Nandurbar police prevented second child marriage in just 2 days

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | राज्यात 11 मे नंतर नवं सरकार स्थापन होणार? राजकीय तज्ज्ञांचा दावा

Pune Mahavitaran News | प्रतिसाद वाढल्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी वेग द्या – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच : मोबाईल कंपनीची फसवणूक करणार्‍या टोळीस गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts