IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | अग्रलेखाला काही महत्व नाही, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला

by nagesh
NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawars reply to sanjay rauts criticism

सातारा :  सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली होती. राष्ट्रवादीमध्ये दुसरं नेतृत्व तयार करण्यात अपयश आल्याचं सामनामध्ये म्हटलं होतं. यावर शरद पवार यांनी देखील सामनामधून करण्यात आलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही. अग्रलेखाला आमच्या लेखी काही महत्व नाही, असा टोला शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, अग्रलेखाला आमच्या लेखी काही महत्व नाही, आम्ही पक्षात काय काम करतो हे राऊतांना माहिती नाही. आम्ही आमचं काम करत आहोत त्यांना काहीही लिहू देत. राष्ट्रवादीने अनेकांना कॅबिनेट मंत्री करुन संधी दिली. त्यामुळे आमच्यावर कोणीही टीका केली तर आम्ही दुर्लक्ष करतो, अशा शब्दात पवारांनी संजय राऊतांना सुनावलं.

 

वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) घ्यायचं
का नाही याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या घटक पक्षात चर्चा सुरु आहे.
यावर बोलताना शरद पवार म्हणाले, अद्याप जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा सुरु झालेली नाही.
वंचितबाबत सर्व घटक पक्षांशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार यांनी सांगितले.

 

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ncp chief sharad pawars reply to sanjay rauts criticism

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | पृथ्वीराज चव्हाणांचे पक्षातील स्थान काय? ‘त्या’ वक्तव्याची पवारांनी उडवली खिल्ली

Chowk Marathi Movie | ‘चौक’ची रोमॅंटिक छटा, ‘तुझ्या डोळ्यांच्या डोहात’ गाणं रिलीज; वैशाली भैसने-माडे, ओंकारस्वरूप यांच्या आवाजाने चार चांद

Pune Police Crime News | कोटयावधीची फसवणूक करणार्‍यास अटकेपुर्वी पोलिस अधिकारी-कर्मचार्‍याचा वरदहस्त? पोलिस दलात चर्चेला उधाण

 

Related Posts