IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | ‘सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद’; एकनाथ शिंदेंच शरद पवारांकडून अभिनंदन

by nagesh
CM Eknath Shinde | eknath shinde showered praise on sharad pawar in pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन NCP Chief Sharad Pawar | राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड दिसून आली. भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याला धक्कातंत्र देणारी घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, आणि आज ते राज्यपालांसमोर शपथ घेतील असं फडणवीसांनी जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

‘सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद असल्याचं,’ शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.
तसेच एकनाथ शिंदे यांचं त्यांनी अभिनंदन देखील केलं आहे.
शरद पवार म्हणाले की, “स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले,
श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद असल्याचं,” ते म्हणाले.

 

 

तसेच दुस-या ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की,
“श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन ! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो.” असं पवार यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | Satarkar is happy that he has become the Chief Minister Congratulations from Eknath Shinde to Sharad Pawar

Related Posts