IMPIMP

NDA Vs INDIA Alliance | विधानसभेच्या 13 जागांसाठी पुन्हा एनडीए विरूद्ध इंडिया सामना, 7 राज्यांमध्ये पोटनिवडणूक

by sachinsitapure

नवी दिल्ली : NDA Vs INDIA Alliance | लोकसभेत काही आमदार हे खासदार म्हणून निवडूण गेल्याने, काहींनी इतर कारणामुळे राजीनामा दिल्याने तसेच सदस्याचा मृत्यू झाल्याने रिक्त झालेल्या विधानसभेच्या १३ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुका एकुण ७ राज्यांमध्ये होणार असून यानिमित्ताने पुन्हा एकदा एनडीए आणि इंडिया आघाडी आमने-सामने येणार आहेत.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला टप्पा ३ जुलै रोजी समाप्त झाल्यानंतर विधानसभेच्या या १३ जागांसाठी १० जुलै रोजी पोटनिवडणूक होईल. या पोटनिवडणुका बिहार – १, हिमाचल प्रदेश – ३, मध्य प्रदेश – १, पंजाब – १, तामिळनाडू – १, उत्तराखंड – २ आणि पश्चिम बंगाल – ४ येथे होणार आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर देहरामधून निवडणूक लढवत आहेत. यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला होता. भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर दोन अपक्षांनी राजीनामा दिल्याने हमीरपूर आणि नालागढ जागांसाठीही लढत होत आहे. भाजपने तिघांनाही पुन्हा उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी इंडिया आघाडीने कंबर कसली आहे. तसेच पंजाबमध्ये देखील या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आम आदमी पार्टी, काँग्रेस, शिरोमणी अकाली दल, भाजप यांचा कस लागणार आहे.

Related Posts