IMPIMP

Note Refund Rules In India | दोन तुकडे झालेल्या नोटा फेकू नका, जमा केल्यास मिळेल पूर्ण रक्कम, जाणून घ्या RBI चा नियम

by sachinsitapure

नवी दिल्ली : Note Refund Rules In India | आरबीआय (RBI) ने बदलण्यायोग्य नोटांना चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले आहे. ज्या नोटेचे दोन तुकडे झाले आहेत अशा नोटेला विकृत नोट म्हटले जाते. विकृत नोटांच्या श्रेणीत त्या नोटासुद्धा येतात, ज्यांचा एक भाग हरवला आहे. विकृत नोटेची स्थिती कशी आहे, यावर नोट जमा केल्यास किती पैसे मिळतील हे अवलंबून आहे. आरबीआयचे यासंदर्भातील नियम जाणून घेऊया (Note Refund Rules).

५० रुपयांपेक्षा छोटी नोट असेल तर

जर तुमची नोट ५० रुपयांपेक्षा छोटी असेल, अथवा २० रुपये, १० रुपये, ५ रुपये अथवा त्यापेक्षा सुद्धा कमी असेल तर या स्थितीत तुम्हाला एका कंडीशनवर पूर्ण रक्कम मिळेल. दोन अथवा जास्त भागात विभागलेल्या नोटेचा मोठा भाग ५० टक्के अथवा त्यापेक्षा मोठा असावा. अशावेळी तुम्हाला त्या नोटेची पूर्ण रक्कम बँकेकडून मिळेल.

नोटांची मोजणी करण्यासाठी आरबीआयने नियम कायदे बनवले आहेत. त्यांच्याच आधारावर नोटेचा सर्वात मोठा भाग किती टक्के आहे हे ठरते. जर मोठा भाग ५० टक्के पेक्षा कमी एरियाचा असेल तर त्या नोटेचा क्लेम रिजेक्टसुद्धा होऊ शकतो.

५० रुपयांपेक्षा जास्तीची नोट असेल तर

५० रुपये अथवा त्यापेक्षा मोठ्या नोटेचे २ अथवा जास्त भाग झाले असतील तर वेगळे नियम आहेत. नोटेचे २ भाग झाले असतील तर पूर्ण पैसे मिळतील, जर त्या नोटेचा मोठा भाग ८० टक्के पेक्षा जासत आहे.

जर विकृत नोटेचा एक भाग ४० टक्केपेक्षा जास्त असेल आणि ८० टक्केपेक्षा कमी असेल तर त्यावर निम्मे मुल्य मिळेल. म्हणजे २०० रुपयांऐवजी तुम्हाला १०० रुपयेच मिळतील. जर नोटेचा सर्वात मोठा माग ४० टक्केपेक्षा कमी आहे तर बँक एक्सचेंज करण्यास नकार देऊ शकते.

Related Posts