IMPIMP

Osmanabad Shivsena | उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकाची आत्महत्या, कारण आलं समोर; प्रचंड खळबळ

by nagesh
Assembly Speaker Election | shivsena whip issued to shiv sena mlas for assembly speaker election maharashtra

उस्मानाबाद : सरकारसत्ता ऑनलाइनउस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेची (Osmanabad Shivsena) पहिली शाखा स्थापन करणाऱ्या (Established First Branch) एका शिवसैनिकाने आत्महत्या केल्याची (Committed Suicide) धक्कादायक घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दत्तात्रय नारायण वऱ्हाडे (Dattatraya Narayan Varhade) असे या शिवसैनिकाचे नाव असून वऱ्हाडे यांनी 1984 साली उस्मानाबाद शहरात जिल्ह्यातील पहिली शिवसेनेची (Osmanabad Shivsena) शाखा स्थापन केली होते. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे सच्चे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वऱ्हाडे हे सच्चे शिवसैनिक होते. प्रत्येक निवडणुकीत ते अग्रेस होऊन शिवसेनेचा (Osmanabad Shivsena) घरोघरी जाऊन प्रचार करत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम श्रद्धा असणारे कर्यकर्ते म्हणून त्यांना जिल्ह्यात ओळखले जात होते. वयाच्या 22 व्या वर्षी 1984 साली अगदी मोजक्या तरुणांना सोबत घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिली शिवसेनेची शाखा उस्मानाबाद शहरात स्थापन केली होती. त्यावेळी त्यांच्याकडे पैसे देखील नव्हते. त्यांनी उधार पैसे घेऊन शाखेची स्थापना केली होती.

 

 

दत्तात्रय वऱ्हाडे यांची उस्मानाबाद शहरात चहाची टपरी होती. त्या चहाच्या टपवरीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. परंतु निवडणूक काळात ते चहाची टपरी बंद ठेवून शिवसेनेचा प्रचार करत होते. त्यांना 4 मुली आणि 2 मुले आहेत. चहाच्या व्यवसायातून त्यांनी आपल्या 4 मुलींची लग्न लावली.
मात्र, दोन मुलांना शिक्षण घेता आले नसल्याने त्यांनी शिक्षण सोडून
कामधंदा सुरु केला. दत्तात्रय वऱ्हाडे हे कुटुंबाला कधीच वेळ देत नव्हते,
मात्र, पक्षासाठी ते नेहमी उपलब्ध असायचे, असे त्यांच्या कुटुंबाने सांगितले.
ते शिवसैनिक होते, यांचा त्यांना खूप अभिमान होता असे देखील कुटुंबीय सांगतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

घरची परिस्थिती बिकट असतानाही शिवसेनेवरील त्यांची निष्ठा कधी कमी झाली नाही.
त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसैनिक हे नातं किती घट्ट होते हे जाणून येते.
मात्र, याच शिवसैनिकाने अखेर आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याने
परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title :- Osmanabad Shivsena | shivsainik committed suicide who established the first shakha of shivsena in osmanabad district

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘माझा ओबीसींवर विश्वास नाही, आरक्षण मागणीसाठी मैदानात लढायला ते नव्हते’

SBI ग्राहकांसाठी ‘गुड न्यूज’, बँकेने उचलले हे मोठे पाऊल

Rupali Chakankar | ‘महिलांना त्रास देणाऱ्या कंपन्यांना टर्मिनेट करण्यात येईल’

Nitesh Rane | ‘नितेश राणे हेच शिवसेनेचे परब यांच्यावरील हल्ल्याचे मुख्य सुत्रधार’, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

 

Related Posts