IMPIMP

Nitesh Rane | ‘नितेश राणे हेच शिवसेनेचे परब यांच्यावरील हल्ल्याचे मुख्य सुत्रधार’, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

by nagesh
Nitesh Rane | life of gauri bhide shud be protected so maharashtra state gov shud give police protection to her right away nitesh rane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनसिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sindhudurg District Bank Election) रणधुमाळीमध्ये शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात भाजपचे आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. नितेश राणे यांनी त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी (Pre Arrest Bail) उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) हेच परब यांच्यावरील हल्ल्याचे मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप राज्य सरकारने (Maharashtra Government) उच्च न्यायालयात केला आहे. आज नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली त्यावेळी राज्य सरकारने हा आरोप केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रमधुमाळीत शिवसेना कार्यकर्ता संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार नितेश राणेच (Nitesh Rane) आहेत, असा दावा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी याप्रकरणी आपल्याला प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करायचे आहे अशी मागणी सरकारी वकिलांनी आज न्यायालयात केली. ही मागणी स्वीकारत न्यायालयात या प्रकरणावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.

 

नितेश राणेंना तुर्तास दिलासा

या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता घेण्याचं न्यायमूर्ती सी.व्ही भडंग (Justice C.V. Bhadang) यांनी निश्चित केलं आहे. मात्र तोपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून संरक्षण देण्यात यावं अशी मागणी त्यांचे वकील नितीन प्रधान (Lawyer Nitin Pradhan) यांनी केली. यावर सिंधुदुर्ग पोलिसांनी (Sindhudurg Police) पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणे यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, असं तोंडी आश्वासन उच्च न्यायालयात दिले. त्यामुळे तुर्तास तरी नितेश राणे यांना दिलासा मिळाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नितेश राणे यांच्या सांगण्यावरुन हल्ला

या हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं (Sindhudurg District Sessions Court) नितेश राणे यांच्यासह अन्य एकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला (Bail Rejected) आहे.
सत्र न्यायालयाच्या निकालाला राणे यांच्या वतीने अॅड. संग्राम देसाई (Adv. Sangram Desai) यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सतिश सावंत (Satish Sawant) यांच्या पॅनलचे निवडणूक प्रचारक संतोष परब यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला.
हा हल्ला आमदार नितेश राणे यांच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप करुन तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी आयपीसी कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 120 (बी) (गुन्हेगारी कट रचणे), 34 (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करून 8 जणांना अटक केली आहे.

 

राज्य सरकारचा सत्र न्यायालयात दावा

गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात आपल्यालाही अटक होण्याची शक्यता असल्याने
नितेश राणे आणि संदेश उर्फ गोट्या सावंत (Sandesh Alias Gotya Sawant) यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयात दोन दिवस युक्तिवाद झाल्यानंतर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.व्ही हांडे (Judge SV Hande)
यांनी त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला. यामध्ये आरोपी तपसात सहकार्य करत नसल्याचा आरोप करत
त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याचा राज्य सरकारचा दावा कोर्टाने मान्य केला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राजकीय सूडबुद्धीने कारवाई

दरम्यान, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना ‘म्याँव म्याँव’ करुन
चिडवल्यानंतर अवघ्या काही तासांत हा गुन्हा दाखल झाला.
त्यामुळे केवळ राजकीय सूडबुद्धीने आणि सरकारचा दबाव असल्यानं या प्रकरणात आपल्याला गोवलं जात असल्याचा दावा
नितेश राणे यांनी अटकपूर्व अर्जातून केला आहे.

 

Web Title :- Nitesh Rane | BJP leader and MLA nitesh rane court hearing will not arrest nitesh rane till next hearing sindhudurg police told bombay high court maharashtra government say

 

हे देखील वाचा :

Blood Sugar | डायबिटीजच्या रूग्णांसाठी विषासारखे आहेत हे खाद्यपदार्थ, जाणून घ्या – काय खावे आणि काय नाही

Earn Money | IRCTC सोबत सुरू करा ‘हा’ बिझनेस, आरामात बसून कमवा हजारो रुपये महिना

PAN-Aadhaar Card Link | जर तुमच्याकडे सुद्धा असेल अशा प्रकारचे पॅन कार्ड तर होऊ शकतो 10000 रुपयांचा दंड, जाणून घ्या नियम!

 

Related Posts