IMPIMP

PF News | कोट्यवधी नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी, 10 वर्षानंतर PF बाबत अर्थसंकल्पात होऊ शकते ‘ही’ घोषणा

by sachinsitapure

नवी दिल्ली : PF News | जर तुम्ही सुद्धा नोकरदार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. होय, यावेळी देशाच्या अर्थसंकल्पानंतर (Union Budget) तुमच्या पगारातून कापला जाणारा प्रोव्हिडंट फंड (PF) वाढू शकतो. सीएनबीसीमध्ये प्रसिद्ध वृत्तात दावा करण्यात आला आहे की, प्रॉव्हिडंट फंडासाठी कमाल वेतन मर्यादा वाढवली जाऊ शकते. यावेळी अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात वेज सिलिंग (Wage Ceiling) वाढवण्याबाबत घोषणा करू शकतात. (Budget 2024)

१० वर्षानंतर वेज सिलिंगमध्ये बदल

सध्या प्रॉव्हिडंट फंडसाठी वेज सिलिंग १५,००० रुपये आहे. यापूर्वी यामध्ये १ सप्टेंबर २०१४ मध्ये बदल करण्यात आला होता, त्यावेळी तो ६५०० रुपयांनी वाढवून १५,००० रुपये केला होता. आता तो १५००० ने वाढवून २५००० रुपये करण्याचा प्रस्ताव दिला होता.

या प्रस्तावावर अंमलबजावणी झाली तर १० वर्षानंतर वेज सिलिंगमध्ये बदल होईल. कामगार मंत्रालयाने याबाबत प्रस्ताव सुद्धा तयार केला आहे.

कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंड योगदान वाढेल!

पीएफ फंड अंतर्गत वेज सिलिंग वाढल्यास कर्मचाऱ्यांचे प्रोव्हिडंट फंडातील योगदान वाढेल आणि त्यांची पीएफमधील बचत वाढेल. सरकार सोशल सिक्युरिटीची कक्षा वाढवण्यासाठी या प्रस्तावावर विचार करत आहे.

किमान वेतन मर्यादा वाढल्याचा परिणाम सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर होईल. कर्मचारी राज्य विमा महामंडळाची सुद्धा २०१७ पासून २१,००० रुपयांची वेतन मर्यादा आहे. कामगार मंत्रालयाचे म्हणणे आहे की, ईपीएफ आणि ईएसआयसी अंतर्गत वेतन मर्यादा एकसारखी असावी.

Related Posts