IMPIMP

PM Kisan Samman Nidhi Yojana | उद्या जारी होईल 17 वा हप्ता, तुम्हाला पैसे मिळणार की नाही, असे घ्या जाणून

by sachinsitapure

नवी दिल्ली :PM  Kisan Samman Nidhi Yojana | पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १८ जून रोजी ९.२६ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा पीएम-किसान योजनेचा १७वा हप्ता जारी करतील. तुम्ही सुद्धा पीएम किसान योजनेत रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला सुद्धा १७वा हप्ता मिळायला हवा. तुम्हाला १७व्या हप्त्याचे पैसे मिळतील अथवा नाही, हे तुम्ही ऑनलाईन जाणून घेऊ शकता.

पीएम किसानच्या वेबसाईटवर सध्याच्या लाभार्थ्यांची यादी पाहून तुम्हाला समजू शकते की, पैसे तुमचा खात्यात येतील अथवा नाही. अनेकदा काही अडचणीमुळे पीएम किसानचा हप्ता खात्यात येत नाही. रजिस्ट्रेशन करताना एखादी माहिती चुकीची भरली असेल, पत्ता अथवा बँक खाते चुकीचे नोंदले असेल, एनपीसीआयमध्ये आधार सीडिंग नसेल तर हप्ता अडकू शकतो.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर
पीएम किसान योजनेसंबंधी कोणत्याही समस्येसाठी किसान ईमेल आयडी[email protected] वर संपर्क करू शकता. पीएम किसान योजनेचे हेल्पलाईन नंबर- १५५२६१, १८००११५५२६ (Toll Free), ०११-२३३८१०९२ द्वारे संपर्क करू शकता.

अशी तपासा लाभार्थी यादी

* पंतप्रधान किसान सन्‍मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in/ वर जा.
* farmer corner वर क्लिक करा.
* नवीन पेज ओपन होईल.
* येथे beneficiary list ऑपशन सिलेक्ट करा.
* एक फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये प्रथम राज्‍य, नंतर जिल्हा, ब्‍लॉक आणि गावाचे नाव निवडा.
* सर्व माहिती भरल्यानंतर get report वर क्लिक करा.
* यानंतर तुमच्या गावातील पीएम किसान योजनेच्या लाभाथ्र्यांची यादी समोर येईल.
* यादीत नाव असेल तर खात्यात पैसे येतील.

Related Posts