IMPIMP

PM Modi On Indian Economy | PM मोदींनी राज्यसभेत सादर केली विकासाची ब्ल्यू-प्रिंट, पुढील 5 वर्षात काय-काय होणार?

by sachinsitapure

नवी दिल्ली : PM Modi On Indian Economy | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मांडताना भारतीय अर्थव्यवस्थेबाबत (Indian Economy) भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आमचा संकल्प भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा आहे. आमचे लक्ष्य टॉप-३ अर्थव्यवस्था बनवणे आहे. यासोबत त्यांनी म्हटले की, ही ५ वर्षे देशात गरिबीविरूद्ध लढाईत निर्णाय ठरणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दावा केला की, आम्हाला जगातील टॉप इकॉनॉमीच्या यादीत भारतीय अर्थव्यवस्थेला १० नंबरवरून पाच नंबरवर पोहोचवण्यात यश मिळाले आहे. मात्र, प्रमुख स्थानावर पोहोचल्यावर आव्हाने नक्कीच वाढली आहेत, परंतु कोरोना महामारी आणि जागतिक तणाव असतानाही या स्थानावर आणण्यात यशस्वी झालो आहोत. (PM Kisan Yojana)

यानंतर देशातील जनतेने आम्हाला ५ नंबरवरून तीन नंबरच्या इकॉनॉमी बनविण्यासाठी जनादेश दिला आहे. आम्हाला जो जनादेश मिळाला आहे, त्यामुळे आम्ही भारताला जगातील टॉप-३ इकॉनॉमीत सहभागी करू.

मोदी म्हणाले, मागील १० वर्षात जे केले त्याची गती आणखी वाढवू आणि ठरविलेले संकल्प पूर्ण करू. जेव्हा देश जगातील तिसरी मोठी इकॉनॉमी बनेल, तेव्हा तिचा प्रभाव जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर पडणार आहे. तसेच जागतिक स्तरावर देखील अभूतपूर्व परिणाम दिसणार आहे. आगामी काळात टियर-२ आणि टियर-३ सिटीज सुद्धा ग्रोथ इंजिनच्या भूमिकेत असतील.

मोदी म्हणाले, नवीन स्टार्टअप्स आणि नवीन कंपन्यांचा विस्तार होईल. सार्वजनिक वाहतुकीत वेगाने बदल होणार आहेत. याचा लाभ देशातील जास्तीत जास्त लोकांना मिळण्यासाठी आम्ही काम करत आहोत.

Related Posts