IMPIMP

Police Suspended | पुण्यात महिलेला पोलिसाकडून मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा अन् निलंबनाची कारवाई

by nagesh
 Police Inspector Suspended | 3 Mumbai cops suspended for ‘assaulting, extracting Rs 25,000’ from 2 doctors

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  दुकानासमोर गाडी लावण्यास मनाई केल्याच्या रागातून एका बांगडी विक्रेत्या महिलेला पोलीस (Pune Police) कर्मचाऱ्याने मारहाण (Beating) केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन त्याच्यावर निलंबनाची (Police Suspended) कारवाई करण्यात आली आहे. हा प्रकार मंडई पोलीस चौकीच्या (Mandai Police Chowki) शेजारी 19 ऑक्टोबर रोजी घडला होता. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) राहुल शिंगे (Rahul Singhe) यांच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची (Police Suspended) कारवाई करण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी कांचन दिपक दोडे Kanchan Deepak Dode (वय-50) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी भाजपच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी संबंधित महिलेस मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी (Police Personnel) राहूल शिंगे याच्यावर कायदेशीर कारवाई (Legal Action) करण्याची मागणी करत पाठपुरावा केला. अखेर शिंगे याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याचे निलंबन केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. निलंबित पोलीस (Police Suspended) कर्मचारी राहूल शिंगे हा खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) कार्यरत आहे.

 

कांचन दोडे यांचे मंडई पोलीस चौकी जवळ बांगड्याचे दुकान आहे.19 ऑक्टोबर रोजी दुपारी शिंगे हे त्यांच्या
दुचाकीवरुन आले. त्यांनी दुकानासमोरील पाण्याच्या टाकीजवळ त्यांची दुचाकी लावली. त्यावेळी कांचन दोडे यांनी
या ठिकाणी दुचाकी पार्क करु नका असे शिंगे यांना सांगितले. याचा राग आल्याने शिंगे यांनी दोडे यांना शिवीगाळ
करुन त्यांच्या तोंडावर डोळ्याजवळ हाताने ठोसे मारुन जखमी केले.

 

याप्रकरणी दोडे या पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेल्या असता पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला.
मात्र भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh), प्रमोद कोंढारे (Pramod Kondhare),
पुष्कराज तुळजापुरकर (Pushkaraj Tuljapurkar) यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यावर
गुन्हा दाखल करुन निलंबीत करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणाचा पाठपुरावा केला.
यानंतर आरोपी राहूल शिंगे याच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबनाची कारवाई करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Police Suspended | A woman was beaten up by the police in a mandai in Pune, a case was registered against the policeman and suspension action was taken

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न- चंद्रकांत पाटील

Maharashtra Additional Collector Transfer | राज्यातील 6 अपर जिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या ! नांदेड, पालघर, भंडारा आणि मुंबई येथील अधिकार्‍यांचा समावेश, सातार्‍याच्या अपर जिल्हाधिकारीपदी गलांडे

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या वडिलांनी शेअर केले तिचे बेडरुम सिक्रेट, म्हणाले – ‘मी तिच्या खोलीत जातो तेव्हा…’

 

Related Posts