IMPIMP

Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दर महिना 5000 रुपयाची करा गुंतवणूक, जाणून घ्या किती मिळेल फंड आणि फायदा

by nagesh
Post Office Saving Scheme | invest rs 5000 every month in this post office scheme know how much fund and benefit you will get

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office Saving Scheme | भारतीय पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणुकीसाठी आजही लोक सुरक्षित गुंतवणुकीचा विचार
करतात. इथे अनेक छोट्या योजना आहेत, ज्यातून लोकांना चांगला नफा आणि अधिक निधी मिळतो. जर तुम्ही पोस्ट ऑफिस सेविंग स्कीममध्ये (Post
Office Saving Scheme) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर अशा अनेक बचत योजना आहेत, ज्या कमी गुंतवणूकीत मॅच्युरिटीवर चांगले
पैसे देऊ शकतात. पोस्ट ऑफिस स्कीम पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Post Office PPF) ही अशीच एक योजना आहे, जी दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय
देते. तथापि, या योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा निश्चित आहे व यामध्ये वर्षाला 1.5 लाख रुपये जमा करता येतात.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोस्ट ऑफिसची PPF योजना
पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) प्लॅनमध्ये तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक प्लॅन करू शकता.
तसेच, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही वार्षिक एकरकमी रक्कम देखील गुंतवू शकता.
या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज हे Fixed Deposit किंवा Recurring Deposit पेक्षा जास्त दिले जाते.
यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही चांगला फंड मिळवू शकता. मॅच्युरिटीवर कोणतेही व्याज किंवा कर नाही.

 

पोस्ट ऑफिस PPF योजनेअंतर्गत लाभ.
जर तुम्ही या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक केली तर तुम्ही एका वर्षात 1.50 लाखांची गुंतवणूक करू शकता. तसेच, तुम्ही ही रक्कम एका वर्षात 12 हप्त्यांमध्ये जमा करू शकता. 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले देखील PPF खाते उघडू शकतात त्याची देखरेख पालक करू शकतात. PPF योजना 15 वर्षांनी मॅच्युर होते, तसेच ती आणखी 5 वर्षांसाठी देखील वाढवता येते. यामध्ये बाजार जोखमीचा धोका बिलकुल नाही. या योजनेत तुम्ही कर्जहि घेऊ शकता. विशेष म्हणजे त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. (Post Office Saving Scheme)

 

5000 च्या गुंतवणुकीवर किती रक्कम.
जर तुम्ही या योजनेत दरमहा 5000 रुपये गुंतवले तर एका वर्षात तुमची एकूण ठेव रक्कम 60,000 रुपये एवढी होईल.
ज्यावर तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के व्याज देखील दिले जाईल.
आणि जर तुम्ही ही रक्कम 15 वर्षांसाठी गुंतवली तर 9 लाख रुपये जमा होतील.
व मॅच्युरिटी रक्कम 16.25 लाख रुपये होईल. यामध्ये एकूण व्याजाची रक्कम 7.25 लाख रुपये असेल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Post Office Saving Scheme | invest rs 5000 every month in this post office scheme know how much fund and benefit you will get

 

हे देखील वाचा :

Bigg Boss Winner 15 : Tejasswi Prakash | तेजस्वी प्रकाश शमिता शेट्टीला म्हणाली ‘आंटी’, यावर शिल्पा शेट्टीनं दिलं तेजस्वीला जबरदस्त उत्तर

Maharashtra Municipal Election | मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, लातूरसह ‘या’ 20 महानगरपालिकांची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात? असा असू शकतो कार्यक्रम

Pune Crime | घरगुती सामान मुंबईला पोहचविण्यासाठी घेऊन मागितली खंडणी; सन लाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स व धारेश्वर पॅकर्स अ‍ॅन्ड मुव्हर्सच्या मालकांविरूध्द गुन्हा

 

Related Posts