IMPIMP

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची गुंतवणूक योजना ! 10 वर्षात 24 लाख; महिन्याला किती गुंतवणूक? जाणून घ्या

by nagesh
Post Office MIS | post office monthly income scheme husband and wife can open an account together

सरकारसत्ता ऑनलाइन – Post Office Scheme | अनेक लोक गुंतवणूक (Investment) करण्यासाठी चांगला पर्याय शोधत असतात. नियमित बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी योग्य आणि सुरक्षित पर्याय म्हणजे आता पोस्ट ऑफिस (Post Office Scheme) आहे. व्यक्तीला बाजारात कोणतीही जोखीम न घेता 5 अथवा 10 वर्षात मोठा निधी तयार करायचा असेल, तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) खाते हा बेस्ट पर्याय तुमच्या समोर आहे. त्यामुळे या योजनेची मॅच्युरिटी (Maturity) पाच वर्ष असणार आहे. तसेच ती योजना 5 वर्षांनी देखील वाढवता येते. ही योजना पुर्णपणे सुरक्षित आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

दहा वर्षात 24 लाखांचा निधी?

पोस्ट ऑफिस स्मॉल सेविंग स्कीम (Small Savings Scheme) आरडीत प्रतिमहिना नियमित ठेव हा हळूहळू एक मोठा फंड होणार आहे. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आता तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिट (RD) मध्ये फक्त 100 रुपयांमध्ये गुंतवणूक सुरू करू शकणार आहात. यात एकदा 100 रुपयांनी खाते उघडल्यानंतर तुम्ही दहा रुपयांच्या पटीमध्ये आणखी ठेवी करू शकता अशी सुविधा आहे. यात गुंतवणुकीची अधिक मर्यादा नाही. (Post Office Scheme)

 

रिकरिंग डिपॉझिटमध्ये सध्या 5.8 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. यात व्याजाची चक्रवाढ तिमाही आधारावर केली जाते. जर तुम्ही पाच वर्षांसाठी प्रतिमहिना १५ हजार रुपये जमा केले आणि ते आणखी पाच वर्षांसाठी वाढवले, तर संबंधित व्यक्तीला 10 वर्षांच्या मॅच्युरिटी वर 24,39,714 लाख रुपये मिळतील. यात, तुमचे 18 लाख रुपये जमा असतील आणि त्यावर 6,39,714 रुपये व्याज देखील मिळणार आहे.

 

 

शंभर रुपयात खाते सुरू –

पोस्ट ऑफिसच्या कुठल्याही शाखेमध्ये केवळ शंभर रुपयांत रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट सुरू करता येते.
यात एखादी व्यक्ती कितीही खाती सुरू करू शकते.
तसेच अधिकाधिक तीन जणांचे जॉइंट अकाऊंट देखील ओपन करता येते.
अल्पवयीन मुलांसाठी पालक खाते उघडले जाऊ शकते.
पोस्ट ऑफिस आरडी खात्याची परिपक्वता पाच वर्षे आहे.
परंतु, प्री-मॅच्युअर क्लोजर तीन वर्षांनी करता येते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) खात्यावर कर्ज देखील घेता येते. बारा हप्ते केल्यानंतर संबधित व्यक्तीच्या खात्यात जमा रकमेच्या 50 टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येते. कर्जाची परतफेड एकरकमी अथवा हप्त्यांत करू शकणार आहे. कर्जाचा व्याजदर आरडीवरील व्याजापेक्षा दोन टक्के अधिक असणार आहे. यामध्ये नामांकनची देखील सुविधा आहे.

 

Web Title :-  Post Office Scheme | post office recurring deposit guaranteed refund Post Office Scheme News

 

हे देखील वाचा :

Sara Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकरची कन्या सारा होणार प्रसिद्ध घराण्याची सून, ‘या’ फोटोमुळे चर्चेत?

Pune Crime | कोल्ड्रिंक्स मधून दारु पाजून मावस बहिणीच्या पतीकडून लैंगिक अत्याचार; फोटो नातेवाईकांना पाठवण्याची धमकी

Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण; 36 गुंठ्यांना मिळाले 1 कोटी 72 लाख

 

Related Posts