IMPIMP

PPF Limit Hike | PPF अकाऊंट होल्डर्ससाठी खुशखबर ! गुंतवणुकीची मर्यादा होऊ शकते दुप्पट

by nagesh
Changes In PPF | changes in ppf account rules major changes in public provident fund know before investment

नवी दिल्ली : वृत्त संस्थाPPF Limit Hike | केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2022-23) सादर होण्यास आता एक महिन्यापेक्षा कमी काळ शिल्लक राहिला आहे. दरम्यान, चार्टड अकाऊंटंटची संस्था इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया म्हणजे आय. सी. ए. आय (ICAI) ने आपल्या अर्थसंकल्प पूर्व निवेदनात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ (Public Provident Fund) स्कीमबाबत शिफारस पाठवली आहे. (PPF Limit Hike)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या अंतर्गत आयसीएआयने म्हटले आहे की, पीपीएफ गुंतवणुकीची कमाल वार्षिक मर्यादा वाढवण्यात यावी. त्यांनी मागणी केली आहे की, सध्याची स्थिती
पाहता ठेवीची मर्यादा वाढवून 3 लाख रुपये करावी. सध्याची वार्षिक गुंतवणूक मर्यादा 1.5 लाख रुपये आहे.

पीपीएफ मर्यादेच्या वाढीवर आय. सी. ए. आय ची शिफारस संसदेत अर्थसंकल्पीय अधिकवेशन सुरू होण्याच्या काही आठवडे अगोदर आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण याच दिवशी संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर करतील. (PPF Limit Hike)

आयसीएआयनुसार, पीपीएफमध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्याने जीडीपीमध्ये लिमिट सेव्हिंगची भागीदारी वाढवण्यात मदत मिळेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

काय आहे पीपीएफ स्कीम

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा पीपीएफ (Public Provident Fund) एक लोकप्रिय लाँग टर्म गुंतवणूक पर्याय आहे. पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी पीरियड 15 वर्ष आहे.
वर्षभरात यामध्ये कमाल 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते.

या खात्यात व्याजदर सरकार वेळोवेळी ठरवते. यामध्ये दरवर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स सवलत मिळते. शिवाय पीपीएफ EEE (Exempt- Exempt- Exempt) कॅटेगरी अंतर्गत येते म्हणजे मॅच्युरिटीवर जे पैसे मिळतात ते सुद्धा करमुक्त असतात.

 

 

Web Title : PPF Limit Hike | ppf limit to be hiked to rs 3 lakh soon all you need to know

 

हे देखील वाचा :

Leucorrhoea-White Discharge | आयुर्वेदिक उपायांनी लवकर सोडवा ‘ल्यूकोरिया’ म्हणजे व्हाईट डिस्चार्जची समस्या; ‘त्रिफळा योनी वॉश’ची कृती जाणून घ्या

PM Kisan अंतर्गत खात्यात आली नसेल रक्कम तर काय करावे, कसे ट्रान्सफर होतील 2000 रुपये? जाणून घ्या

Multibagger Penny Stocks 2022 | यंदाच्या वर्षी ‘हे’ 3 स्टाॅक ठरु शकतात ‘मल्टीबॅगर’; जाणून घ्या

 

Related Posts