IMPIMP

Praniti Shinde | दोन उपमुख्यमंत्री शाखाप्रमुखासारखे वागतात, उठ सुट नेत्यांना धमक्या देतायत; प्रणिती शिंदेंचा घणाघात

by sachinsitapure

सोलापूर : – Praniti Shinde | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Solapur Lok Sabha) जनाधार विरोधात चालल्यामुळे दोन उपमुख्यमंत्री शाखाप्रमुख सारखे वागत असून मतासाठी उठ सुट नेत्यांना धमक्या देण्याचे काम सुरु केल्याचा आरोप काँग्रेसच्या उमेदवार (Congress Candidate) प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या गटाचे काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

यावेळी ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुशील आवताडे, शैलेश आवताडे, दादा गरंडे, जमीन सुतार, हर्षराज बिले, बिरुदेव घोरगे, मारुती वाकडे, प्रशांत गायकवाड, संजय पवार, दिलीप सावंत, सिद्धेश्वर हेंबाडे, बलभिम शिंदे उपस्थित होते.

यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या, सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी महाराष्ट्रातील असताना महाराष्ट्रातील कांद्यावर निर्यातबंदी घालून गुजरातचा कांदा परदेशात विकण्यासाठी खुला केला आहे. दुधाचा दर कमी केला. शेतकऱ्याला दिले जाणारे अनुदान अद्याप दिले नाही. सातत्याने शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं काम केल्यामुळे ही निवडणूक लोकांनीच हातात घेतली.

मी मात्र नाममात्र उमेदवार आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी हे उमेदवाराकडे बघू नका माझ्याकडे बघून मतदान करा अशी म्हणण्याची वेळ आली. कर्नाटकातील भाजप उमेदवार अडीच हजार महिलांवर अत्याचार केला आणि पंतप्रधान म्हणतात त्यांच्याकडे बघून मला मतदान करा अश्यांची जागा दाखवण्याची वेळ या निवडणुकीतून आली आहे. या निवडणुकीत ते 400 पार होणार नसून दीडशेच्या आतच गार होणार आहेत.

एकट्या महिलेच्या विरोधात राज्यातील नेत्याबरोबर आता उत्तर भारतातील नेते प्रचारात आणून शहरात जातीय द्वेष पेरण्याचे काम करुन युपी, बिहार बनवण्याचा काम सध्या भाजपवाल्याकडून सुरु असल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

Shaina NC In Pune | मोदी सरकारने राबविलेल्या धोरणांमुळे देशाचा विकास आणि महिलाशक्ती सक्षम झाली – भाजप राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी.

Related Posts