IMPIMP

Pune Aam Aadmi Party | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरणी पुण्यात ‘आप’कडून भाजपचा निषेध

by nagesh
Aam Aadmi Party Pune | Pune Municipal Corporation courtesy of city corporators and concept boards should be removed; - Demand for AAP Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Aam Aadmi Party | आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी ट्विटरद्वारे दिली. यानंतर आप कार्यकर्ते (Pune AAP) चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान याचे पडसाद महाराष्ट्रात (Maharashtra AAP) देखील उमटले. आज पुण्यातील आप कार्यकर्त्यांनी (Pune Aam Aadmi Party) हल्ला प्रकरणी भाजपचा (BJP) निषेध करण्यात आला. तसेच याप्रकरणातील भाजपचे नेते, कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणीही करण्यात आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

”मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर आज तेजस्वी सुर्या (Tejasvi Surya) यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले, सिक्युरिटी बॅरियर तोडले, मुख्यमंत्र्यांच्या घराच्या दरवाज्यावर रंग फासले. हे सर्व होत असताना दिल्ली पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत राहिले. जिथे इतर मुख्यमंत्र्यांच्या घराच्या आसपास लोकांना फिरकूही दिले जात नसताना मुख्यमंत्री यांच्या घराबाहेर भाजपच्या गुंडांच्या एका मोठ्या समूहाला अशा पद्धतीने राडा घालू देणे हा एका पूर्वनियोजित कटाचा भाग आहे.” असं आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी म्हटलं आहे. (Pune Aam Aadmi Party)

 

केवळ 10 वर्षांत आपने दिल्लीपाठोपाठ पंजाब मध्ये प्रचंड बहुमताने सत्ता मिळवल्याने भाजप (BJP) प्रचंड विचलित झाला आहे. दिल्ली महापालिकेमध्ये 15 वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या भाजपला पराभवाची काळजी वाटत असून केंद्र सरकारने (Central Government) एक कायदा आणून दिल्ली महापालिकांच्या नियोजित निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या. काश्मीर फाइल्स या चित्रपटावरून भाजप राजकारण करत आहे. भाजप गेली अनेक दशके काश्मीरी पंडितांचे राजकारण करत असून प्रत्यक्षात 13 वर्षे केंद्रात सत्ता असूनही भाजपने काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी हितासाठी काहीच केले नाही. त्यामुळे काश्मीर फाइल्स चित्रपटाचे पोस्टर लावून आपण काश्मिरी पंडितांसाठी काहीतरी करत असल्याचा आव भाजपा आणत आहे, ही बाब मुख्यमंत्री केजरीवाल यांनी देशातील लोकांच्या नजरेसमोर आणली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार स्थलांतरित काश्मीर पंडित कंत्राटी शिक्षकांना नियमित करून
त्यांना स्थायी रोजगार देऊ बघत असताना लेफ्टनंट गव्हर्नर यांना सोबत घेऊन
भाजपने काश्मिरी पंडित शिक्षकांच्या हिता विरोधामध्ये उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये आडकाठी आणली
हे आता सप्रमाण आम आदमी पक्षाने काल सिद्ध केले.
दिल्लीतील सरकार काश्मीरी पंडितांसाठी काम करत असताना भाजपच्या ताब्यातील सरकारे या प्रश्नावर केवळ राजकारण करत आहेत हे लोकांना कळत आहे.
भाजपचा दुटप्पी चेहरा हा विद्रुपपणे लोकांच्या समोर आल्याने चिडून, घाबरून जाऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल
यांच्या घरावर हल्ला केला असल्याचं पुण्यातील आपने म्हटलं आहे.

 

Web Title :- Pune Aam Aadmi Party | BJP protests from AAP in Pune over attack on Chief Minister Arvind Kejriwal’s house

 

हे देखील वाचा :

Shreemant Dagdusheth Halwai Music Festival | यंदा गुढीपाडव्यापासून प्रारंभ होणार श्रीमंत ‘दगडूशेठ’चा संगीत महोत्सव; 9 दिवस रंगणार कार्यक्रम

Pune Corporation | अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍या ‘त्या’ बड्या राजकिय कार्यकर्त्यावर गुन्हा नाही ?, उलटसुलट चर्चा सुरू

Gold Silver Price Today | सोन्या – चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा भाव

 

Related Posts