IMPIMP

Pune Corona | राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुणे दुसऱ्या क्रमांकावर; जाणून घ्या सक्रिय रूग्णांची संख्या

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, 867 patients of 'Corona' were discharged in Pune city, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona second wave) राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण (Active patient) पुणे जिल्ह्यात (Pune Corona) होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने (state health department) दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यात 6441 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात (Pune Corona) 1667 रुग्ण आहेत. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 25 टक्के रुग्ण पुणे जिल्ह्यात (Pune district) आहेत. तर मुंबईत सर्वाधिक 1774 सक्रिय रुग्ण आहेत.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

दरम्यान, राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण (Omycron patient) आढळून आले आहेत. राज्यात ओमायक्रॉनच्या संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी दैनंदिन जीवनात नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन राज्याच्या आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

सध्या राज्यात मुंबई आणि पुणे जिल्ह्यात 1500 पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाणे जिल्ह्यामध्ये (Thane District) 1000 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 500 पेक्षा कमी आहे. राज्यात सर्वात कमी सक्रिय रुग्ण धुळे जिल्ह्यात (Dhule district) आहेत. धुळे जिल्ह्यात केवळ दोन रुग्ण सक्रिय आहेत. या खालोखाल वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांचा नंबर लागतो. या दोन जिल्ह्यात तीन रुग्ण सक्रिय आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.72 टक्के आहे. (Pune Corona)

पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉनचे 11 रुग्ण
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक फटका पुण्याला बसला आणि पुणे कोरोनाचे हॉटस्पॉट (Corona hotspot) ठरले. या वर्षी एप्रिल-मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला. मे महिन्यानंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात 11 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

जानेवारीत कोरोनाची तिसरी लाट
जानेवारी महिन्यात तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज गणितीय मांडणीच्या आधारे बांधला जात आहे. कोरोनाच्या कितीही लाटा आल्या किंवा कोणत्याही प्रकारचा नवीन व्हेरियंट आला तरी लसीकरण (Vaccination) हे सध्याचे एकमेव उत्तर असल्याने नागरिकांनी लसीकरणाला प्राधान्य द्यावे तसेच आपले लसीकरण पूर्ण करुन घ्यावे असे सांगण्यात येत आहे.

 

जिल्ह्यात 11 लाख रुग्ण कोरोनामुक्त
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 88 लाख 22 हजार 113 संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली.
त्यापैकी 11 लाख 59 हजार 628 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.
त्यापैकी 11 लाख 38 हजार 766 रुग्ण बरे झाले असून ते घरी परतले आहेत.

 

राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण

मुंबई – 1774

पुणे – 1667

ठाणे – 1060

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

सर्वात कमी सक्रिय रुग्ण

धुळे – 2

वर्धा, वाशिम – 3

 

Web Title :- Pune Corona | pune district ranks second number corona active patients in maharashtra

 

हे देखील वाचा :

Sara Ali Khan – Janhavi Kapoor | एपी ढिल्लनच्या गाण्यावर जान्हवी आणि साराचा डान्स

Kareena Kapoor-Amruta Arora | अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरोला कोरोनाची लागण

Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

 

Related Posts