IMPIMP

Pune Corporation Vaccination | पुणे महापालिकेच्या ‘व्हॅक्सीन ऑफ व्हिल्स’ उपक्रमाला घरगुती कामगार, कलाकार, झोपडपट्टीतील नागरिक, मजूर वर्गाचा भरभरून प्रतिसाद

आतापर्यंत 1313 कॅम्पचे आयोजन ! 3 लाख 11 हजार नागरिकांचे लसीकरण

by nagesh
Pune Municipal Corporation-PMC | corona preventive dose in 68 hospitals from pune municipal corporation pmc

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation Vaccination | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेने वेगाने लसीकरण (Pune Corporation Vaccination) करण्यासाठी ‘व्हॅक्सीन ऑन व्हील्स’ (vaccine on wheels) या उपक्रमाअंतर्गत विविध समाज घटकांसाठी घरी अथवा कामाच्या ठिकाणी जाउन लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत तब्बल 1 हजार 313 कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून 3 लाख 11 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष असे की झोपडपट्टयातील नागरिक आणि बांधकाम मजूरांनी या उपक्रमांना अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद दिला असून यूपीएससीचे विद्यार्थी व जिम ट्रेनरसाठी आयोजित कॅम्पसला नगण्य प्रतिसाद मिळाला आहे.

 

संपुर्ण देशभरात 16 जानेवारीला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू झाली. लसीच्या उपलब्धतेनुसार प्राथमिकता ठरवून लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, काही कालावधीत अधिकाअधिक नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी स्थानीक पातळीवर विविध उपाययोजना करण्यात आल्या. महापालिकेनेही व्हॅक्सीन ऑन व्हील्स या (Pune Corporation Vaccination) विशेष मोहीमेअंतर्गत समुहगटांसाठी लसीकरण कॅम्पांचे आयोजन केले. यानुसार संबधीत समुहांकडून अथवा संस्थांकडून लसीकरणासाठी संख्यात्मक मागणी नोंदविण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत विविध घटकांनी व संस्थांनी 2 लाख 79 हजार जणांच्या लसीकरणाची मागणी नोंदविली. मात्र, प्रत्यक्षात तब्बल 3 लाख 11 हजार 653 जणांचे लसीकरण करण्यात आल्याने या उपक्रमाला शंभर टक्क्यांहून अधिक प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले (Pune Corporation Vaccination) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या उपक्रमाअंतर्गत प्रामुख्याने बांधकाम मजूर, झोपडपट्टीतील नागरिक, वृद्धाश्रम, दिव्यांग, धर्मगुरू, तृतीयपंथी, देवदासी, बेघर, घरेलू कामगार, बांधकाम मजूर,
पथारीवाले, फेरीवाले, दुकानदार, भाजी विक्रेते, आंथरूणाला खिळलेले रुग्ण, एनजीओ, मिडीया, परदेशात जाणारे विद्यार्थी व नागरिक, कलाकार,
यु.पी.एस.सी.चे विद्यार्थी, जिम प्रशिक्षण व बॉडी बिल्डर अशा विविध घटकांतील नागरिकांसाठी त्यांच्या ठिकाणी जावून लसीकरण करण्यात आले.
बांधकाम मजूर, झोपडपट्टीतील नागरिक, कलाकार, घरेलू कामगारांनी या उपक्रमाला शंभर टक्क्यांहून अधिक प्रतिसाद दिला.
तर अन्य क्षेत्रातील नागरिकांच्या कॅम्पच्या ठिकाणी हेच प्रमाण 70 ते 80 टक्क्यांच्या आसपास राहीले. मात्र, युपीएससीचे विद्यार्थी आणि
जिम ट्रेनरसाठी घेतलेल्या कॅम्पला अत्यल्प प्रतिसाद (Pune Corporation Vaccination) मिळाला आहे.

 

Web Title :- Pune Corporation Vaccination | Domestic workers, artists, slum dwellers, working class respond to Pune Municipal Corporation’s ‘Vaccine of Wheels’ initiative

 

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,968 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | सक्सेस स्क्वेअरमध्ये कोजागरी जल्लोषात

Pune Crime | पुण्यात कंत्राटाच्या वादातून ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्याला भोसकले, 2 जणांवर FIR

 

 

Related Posts