IMPIMP

Pune Court Crime News | पुणे: पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

by sachinsitapure
Pune Court

पुणे :  – Pune Court Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) पाटस येथील घरी नेऊन तिच्या मनाविरुद्ध अश्लिल वर्तन करुन विनयभंग (Molestation Case) करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे (Judge S. P. Ponkshe) यांनी जमीन मंजूर केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर (Adv. Jitendra Ashok Janapurkar) यांनी दिली. हा प्रकार 15 फेब्रुवारी 2024 रोजी घडला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन (Vishrantwadi Police Station) येथे आयपीसी 363, 354 सह पोक्सो अॅक्ट अन्वये (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिजाबा वाल्मिकी शिंदे (वय- 23 रा- मानगीर बाबा चौक, सुरक्षा नगर, येरवडा पुणे) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मुलीच्या आई ने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यावरून सर्वप्रथम मुलीच्या आईने अज्ञात इसमाविरुद्ध मुलीला फूस लावून पळवून नेल्याबाबत भा. द. वि. कलम 363 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर मुलीचा शोध घेतल्यानंतर मुलीने दिलेल्या माहिती वरून सदर गुन्ह्यात भा. द. वि. कलम 354 आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो अॅक्ट) कलम 8, 12 अशी कलम वाढ करण्यात आली.

सविस्तर माहिती अशी की, या गुन्ह्यात फिर्यादी या मुलीची आई असून त्यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे फिर्यादी यांच्या मुल, मुली आणि सासू असे रहाण्यास आहेत. दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी कामावर गेले असता, त्यांना दुपारी साडे तीन वाजता सासूचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मुलगी ही दुपारी दोन वाजता शाळेतून दाखला घेऊन येते असे सांगून गेली अद्याप परत आली नाही. हे कळताच मुलीला फोन केला असता फोन स्विच ऑफ येत होता. तसेच सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लाऊन पळवून नेले असल्याबाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. त्यानंतर दिनांक 1 मार्च 2024 रोजी मुलगी मिळून आली. मुलीने दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी याने तिला पाटस पुणे येथील घरी नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मनाविरुद्ध तिला किस करुन तसेच अश्लील स्पर्श करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्ने होईल असे कृत्य करुन विनयभंग केला आहे.

या गुन्ह्यात जामीन मिळवा यासाठी आरोपीने ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांच्या मार्फत अर्ज केला. जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान ॲड. जितेंद्र जानापुरकर यांनी युक्तिवाद करून आरोपी तर्फे बाजू मांडली याचप्रमाणे सरकारी वकील यांनी जामीन मिळू नये यासाठी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला.

न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करता युक्तिवाद ऐकून कोर्टाच्या निदर्शनानुसार पीडित मुलगी हिने स्वतः घर सोडले आणि अर्जदाराच्या घरी गेली. आरोपी व पिडीत यांच्या प्रेमप्रकरणाचे हे प्रकरण आहे. पिडीतेने तिच्या कृत्याचे परिणाम समजून घेण्याचे आणि जाणण्याचे वय गाठले आहे. अर्जदाराचे वय 23 आहे. तसेच पिडीताचे वय 17 वर्ष 5 महिने आहे. अशा परिस्थितीत, अर्जदार आणि पिडीतेचे प्रेम संबंध लक्षात घेता आणि अर्जदारविरुद्ध कोणताही गुन्हेगारी पूर्ववर्ती नसल्यामुळे अर्जदाराची जामीनावर सुटका करणे न्याय व योग्य आहे. त्यामुळे अर्जदार आरोपीचा अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला. या प्रकरणात ॲड. आनंद चव्हाण, ॲड. मयुर चौधरी यांनी मदत केली.

Related Posts