IMPIMP

Pune Crime News | ट्रेडिंगसाठी दिलेल्या पैशावर 10 टक्के व्याज ! लॉस करून 99 लाखांची फसवणूक, चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | 10 percent interest on money given for trading! 99 lakhs fraud by loss, case filed in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | ट्रेडिंगमध्ये लॉस (Trading Loss) करून अ‍ॅग्रीमेंटमध्ये ठरल्यानुसार लॉस झालेले पैसे आणि टक्केवारी परत न देता 99 लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) एकाविरूध्द फसवणूकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल झाला आहे. सदरील गुन्हा तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

नितीन जगन्नाथ गोते Nitin Jagannath Gote (रा. बिवरी, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. यासंदर्भात खराडी (Kharadi) परिसरात राहणार्‍या 51 वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 7 फेब्रुवारी 2022 पासुन गुन्हा दाखल होण्यापुर्वीच्या कालावधी दरम्यान आरोपी नितीन जगन्नाथ गोतेने फिर्यादीस तुम्ही माझेकडे ट्रेडिंग करा व तुम्ही मला ट्रेडिंग करिता जी रक्कम द्याल त्यावर महिन्याला 10 टक्के व्याज देतो असे सांगितले. फिर्यादींनी ट्रेडिंग करिता त्यांचे डिमॅट अकाऊंटवर (Demat Account) 1 कोटी रूपये टाकले. त्यापैकी 99 लाख 7 हजार 871 रूपयांचा आरोपीने ट्रेडिंगमध्ये लॉस केला. अ‍ॅग्रीमेंटमध्ये ठरल्यानुसार लॉस झालेले पैसे व टक्केवारी परत न करता फिर्यादीचा विश्वास संपादन करून फसवणूक (Fraud Case) केली. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरोपी पैसे परत करत नसल्याने फिर्यादीने पोलिसांकडे तक्रारअर्ज दिला.
अर्ज चौकशीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | 10 percent interest on money given for trading! 99 lakhs fraud by loss, case filed in Chandannagar police station

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | ‘खोकेबहाद्दरांनी बोलू नये, उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे यांनी मंत्रीपदासाठी पैसे घेतले,’, शिंदे गटाच्या मंत्र्याचा गंभीर आरोप

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, पुणे पोलिस संघ उपांत्य फेरीत !!

Gulabrao Patil | ‘…तर परमेश्वर तुमचं भलं करो’, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Maharashtra Politics News | ‘या’ एका कारणामुळे शिंदे-ठाकरे एकत्र येणं अशक्य, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान

 

Related Posts