IMPIMP

Pune Crime News | सिगारेटला पैसे न दिल्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, वानवडी परिसरातील घटना

by nagesh
Beaten

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Crime News | घरी जाणार्‍या तरुणाला अडवून सिगारेटसाठी (Cigarette) पैसे मागितले. परंतु, त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Pune Police) तिघांवर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

मंगेश रवींद्र जाधव (वय २०, रा. रामटेकडी, हडपसर) आणि आयुशे रवींद्र काळे (वय २२, रा. ब्रम्हा अव्हेन्यू सोसायटी, शिवनेरीनगर, कोंढवा) यांना अटक (Arrest) केली असून महेश शिंदे (रा. रामटेकडी, हडपसर) याच्यावर गुन्हा दखल केला आहे.

 

रोहित सिद्धार्थ शिवशरण (वय २७, रा. आदिनाथ सोसायटीचे आवारात, रामटेकडी, हडपसर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

याप्रकरणी सिद्धार्थ विठ्ठोबा शिवशरण (वय ६०) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३०/२३) दिली आहे. हा प्रकार अदिनाथ सोसायटीचे आवारात शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडला होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शिवशरण हा त्याच्या बहिणीच्या घरातून धुतलेले कपडे घेऊन
घरी येत होता. वाटेत आरोपींनी त्याला अडवून सिगारेटसाठी पैसे मागितले.
त्याने पैसे न दिल्याने त्यांनी रोहित यांच्या डोक्यात, कमरेवर, पाठीत कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले.
रोहित याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक गिरमकर तपास
करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | An attempt was made to kill a young man by stabbing him to death for not paying for cigarettes, an incident in Wanwadi area.

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | कोयता गँगचा गोर्‍हे गावात धुडगुस; सिगारेटसाठी कोयत्याचा धाक दाखवून धमकावले

Pune Crime News | कोयता गँगचा गोर्‍हे गावात धुडगुस; सिगारेटसाठी कोयत्याचा धाक दाखवून धमकावले

Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटाला सवाल; म्हणाले – ‘बाळासाहेबांच्या सुपुत्राने जेव्हा…’

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन; दाऊदच्या नावे फोन करून केली खंडणीची मागणी

 

Related Posts