IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – दारु पिऊन शिवीगाळ करणार्‍या वडिलांचा मुलाने केला खून

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News: Hadapsar Police Station - Son Killed Father Who Abused Liquor

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | घरी दारु पिऊन शिवीगाळ करीत असलेल्या वडीलांशी झालेल्या वादातून मुलाने वडिलांना काठीने मारहाण करुन त्यांचा गळा दाबून खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रवि क्षीरसागर (वय ५२) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी ओंकार रवी क्षीरसागर (वय २७, रा. मांजरी – Manjri) याला अटक केली आहे.

 

त्यांची पत्नी रेखा रवी क्षीरसागर (वय ४३, रा. घुले पाटील कॉलनी, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७१६/२३) दिली आहे. ही घटना मांजरीतील घुले पाटील कॉलनीत (Ghule Patil Colony) ९ मे रोजी दुपारी १२ वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती रवी हा चप्पल शिवण्याचे काम करत असत.
त्याचा मुलगा ओंकार हा काही काम करत नाही. रवी हा नेहमी दारु पिऊन येऊन शिवीगाळ करीत असे.
९ मे रोजी तो असाच दारु पिऊन घरी आला व शिवीगाळ करु लागला.
त्याचा राग येऊन ओंकार याने वडिलांना काठीने मारहाण केली. त्यांचा गळा दाबला. त्यात रवी हा निपचित पडला.
त्यानंतर ओंकार निघून गेला. फिर्यादी यांना पती निपचित पडून असल्याचे दिसल्यावर त्यांनी रवीला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मयत झाल्याचे जाहीर केले. शवविच्छेदनात त्यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फिर्यादी यांनी चौकशी केल्यावर मुलानेच त्यांचा गळा दाबून मारल्याचे उघड झाले.
पोलिसांनी ओंकार क्षीरसागर याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव (API Jadhav) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News: Hadapsar Police Station – Son Killed Father Who Abused Liquor

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | ‘काल त्यांनी सर्व अर्धवट सांगितलं…’ अनिल परब यांनी निकालातील ठळक मुद्दे वाचून दाखवले (व्हिडिओ)

Uddhav Thackeray On Rahul Narvekar | ‘जर अध्यक्षांनी काही उलट-सुलट केलं तर…’, उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्षांना इशारा (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मुंढवा पोलिस स्टेशन – घोरपडी पोलिस चौकीत राडा ! साडी फेडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, 5 जणांना अटक

 

Related Posts