IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – ज्येष्ठ कचरावेचक महिलेच्या अंगावर कुत्रा सोडून केली मारहाण; पैसे न देता कचरा उचलण्याची केली सक्ती

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Kothrud Police Station - A senior garbage collector was beaten up by a dog; Forced to pick up garbage without payment

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | पैसे न दिल्याने कचरा उचलला नाही. त्या रागातून एका कुटुंबाने ज्येष्ठ कचरा वेचक महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली. तिच्या अंगावर कुत्रा सोडल्याने तो चावला. जिन्यावरुन तिला खाली फरफटत ओढत खाली आणल्याने ही महिला गंभीर जखमी झाली. (Pune Crime News)

 

याबाबत लक्ष्मी दत्ता गायकवाड (वय ६५, रा. जय भवानीनगर, कोथरुड – Kothrud) यांनी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १००/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुप्रिया संजय कांबळे (वय २३, रा. जय भवानी नगर, कोथरुड) व तिचा भाऊ व वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता घडली. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कचरावेचक महिलांना कचरा उचलण्यासाठी दर महिना ७० रुपये देणे आवश्यक आहे. कांबळे यांनी मागील तीन महिने पैसे दिले नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचा कचरा उचलला नाही. आरोपी सुप्रिया हिने फिर्यादी यांना कचरा का घेतला ना ही, अशी विचारणा केली.
तेव्हा पैसे देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. सुप्रिया हिने लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या डोक्यात, पाठीवर मारुन जखमी केले. सुप्रिया हिच्या भावाने कुत्रा अंगावर सोडल्याने तो फिर्यादीला चावून त्या जखमी झाल्या. सुप्रिया हिच्या वडिलांनी फिर्यादीस जिन्यावरुन खाली फरफटत ओढत आणले. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Pune Crime News : Kothrud Police Station – A senior garbage collector was beaten up by a dog; Forced to pick up garbage without payment

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – महिलेचा खून करुन मृतदेह टाकला विहीरीत

Shambhuraj Desai | संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर शंभूराज देसाईंचं प्रत्त्युत्तर, म्हणाले-‘स्वत:चं ठेवायचं झाकून आणि…’

Pune PMC Water Supply Dept News | पुणे महानगरपालिका : शहरात लवकरच आठवड्यातून एक दिवस पाणी कपात ! अल निनोच्या पार्श्‍वभूमीवर मनपाची तयारी सुरू

Nana Patole | अजित पवार मुख्यमंत्री होणार? नाना पटोले म्हणाले – ‘मोदी है तो मुमकिन है’

 

Related Posts