IMPIMP

Pune PMC Water Supply Dept News | पुणे महानगरपालिका : शहरात लवकरच आठवड्यातून एक दिवस पाणी कपात ! अल निनोच्या पार्श्‍वभूमीवर मनपाची तयारी सुरू

by nagesh
Pune PMC Water Supply Dept News | Pune Municipal Corporation: One day of water reduction in the city soon! In the background of El Nino, preparations for the municipal government are underway

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC Water Supply Dept News | अल निनोच्या (EL Nino India) प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहाणार असल्याने राज्य शासनाने (Maharashtra State Govt) सर्वच स्थानीक स्वराज्य संस्थांना उपलब्ध पाण्याचे आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे महापालिकेनेही Pune Municipal Corporation (PMC) खडकवासला धरण (Khadakwasla Dam) साखळीतील उपलब्ध पाणी साठ्याचा अंदाज घेउन नियोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून लवकरच आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करावी लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. (Pune PMC Water Supply Dept News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यंदा अल निनो वादळामुळे पाउस विलंबाने आणि पावसाचे प्रमाण कमी राहाण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तविली आहे. यामुळे केंद्र शासन आणि राज्य शासनही सतर्क झाले आहे. राज्य शासनाने सर्वच स्थानीक स्वराज्य संस्थांना संभाव्य टंचाईचा सामाना करण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनही आराखडा तयार करण्याच्या कामात गुंतले आहे. (Pune PMC Water Supply Dept News)

 

शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरणसाखळीमध्ये आजमितीला ११.७६ टीएमसी पाणीसाठा आहे. शहराला दररोज १४७० एमएलडी पाणी लागते. दरवर्षी १५ जुलै पर्यंत पाण्याचे नियोजन करून उपलब्ध धरणसाठ्यातून पुणे महापालिका आणि शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. परंतू यंदा अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाला विलंब होण्याचा तसेच पावसाचे प्रमाण कमी राहाण्याचा अंदाज राष्ट्रीय वेधशाळेने व अन्य हवामान अभ्यासक संस्थांनी वर्तविल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे महापालिकेने ३१ ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्याची तयारी केली आहे. या कालावधीत दोन बाष्पीभवन व गळतीतून २ टीएमसी पाणी खर्ची होईल व धरणांतून पुढील गावांच्या शेतीसाठी व पिण्यासाठी सुमारे साडेतीन टीएमसी पाण्याची गरज भासेल. उर्वरीत अर्थात ६.२५ टीएमसी पाणी ३१ ऑगस्टपर्यंत वापरायचे झाल्यास महापालिकेला आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवावे लागेल, अशी माहीती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

 

कालवा समिती (Kalwa Samiti) बैठकीनंतरच निर्णय
अलनिनोच्या प्रभावामुळे पाउस लांबण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने राज्य शासनाने महापालिकेला उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका स्तरावर पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांना देखिल पाणी वापराबाबत आवाहन करण्यात येत आहे. येत्या २६ एप्रिल रोजी कालवा समितीची बैठक होणार आहे.
या बैठकीमध्ये पुणे महापालिकेला उपलब्ध होणार्‍या पाणीसाठ्याची माहिती घेतल्यानंतरच पाणी कपातीचा निर्णय जाहीर करण्यात येईल.
आजपर्यंत तरी कपातीचा कुठलाही निर्णय झालेला नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

– अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता, पुणे महापालिका पाणी पुरवठा विभाग.
(Anirudh Pavaskar, Superintending Engineer, Pune Municipal Water Supply Department.)

 

Web Title :- Pune PMC Water Supply Dept News | Pune Municipal Corporation: One day of water reduction in the city soon! In the background of El Nino, preparations for the municipal government are underway

 

हे देखील वाचा :

Nana Patole | अजित पवार मुख्यमंत्री होणार? नाना पटोले म्हणाले – ‘मोदी है तो मुमकिन है’

Bombay High Court | …तोपर्यंत सरकारी दस्तावेजांवरील औरंगाबाद नाव बदलू नका, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Maharashtra IPS Transfer | आयपीएस अनिल पारसकर, अभिनव देशमुख, सारंग आव्हाड, शशिकुमार मीना, प्रविण पाटील, अरविंद चावरिया यांच्यासह 10 जणांना पोलिस उप महानिरीक्षक पदी बढती

 

Related Posts