IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – व्यापार्‍यास बेदम मारहाण करून खंडणी मागणार्‍या दोघांना अटक

by nagesh
 Pune Crime News | Pune Crime News : Vimannagar Police Station - Two arrested for brutally beating a businessman and demanding ransom

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | विमाननगर परिसरातील व्यापार्‍यास बेदम मारहाण करून लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन खंडणी मागणार्‍या दोघांना विमाननगर पोलिसांनी (Viman Nagar Police Station) अटक केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रोहित नागेश कोळी Rohit Nagesh Koli (22, रा. संजय पार्क, गल्ली नं. 3, न्यु एअरपोर्ट रोड, लोहगाव – News Airport Road Lohegaon) आणि सोमनाथ दिपक गायकवाड Somnath Deepak Gaikwad (21, रा. संजयपार्क, विमाननगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, विमाननगर परिसरात काकाचा चहा दुकानाचे (Kakacha Chaha Shop) व्यावसायिक विकास श्रीचंद्रपाल सिंग (35, रा. गंगापुरम सोसायटी, विमानगर) हे दि. 18 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानात होते. त्यावेळी एकाने त्यांच्या दुकानात येवुन त्यांना लोखंडी हत्यारा धाक दाखवुन खंडणीची मागणी केली तसेच त्यांना बेदम मारहाण करून पळ काढला. (Pune Crime News)

 

याबाबत विमाननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आरोपींचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार दादासाहेब बर्डे, नाना कर्चे आणि योगेश थोपटे यांना सदरील गुन्हयातील आरोपी हे म्हाडा कॉलनीजवळील मोकळया मैदानात असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली.

 

पोलिस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे यांनी सदरील माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांना कळविली.
पोलिस पथकाने सापळा रचुन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा
केल्याची कबुली दिली. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वाकडे (PSI Wakde) करीत आहेत.

 

अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे
(DCP Shashikant Borate), सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav) यांच्या
आदेशान्वये वरिष्ठ पोलस निरीक्षक विलास सोंडे (Sr PI Vilas Sonde), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता माळी
(PI Sangeeta Mali) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे (Ravindra Dhaware),
पोलिस अंमलदार अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, गिरीष नाणेकर, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे,
योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे आणि ज्ञानेश्वर आवारी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Vimannagar Police Station – Two arrested for brutally beating a businessman and demanding ransom

 

हे देखील वाचा :

National Commission for Safai Karamcharis | केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची सफाई कामगारांच्या मुलांच्या शाळेला भेट

Jal Jeevan Mission Maharashtra | ‘जल जीवन मिशन’अंतर्गतची कामे मिशन मोडवर पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Maharashtra Cabinet Decision | महाराष्ट्र सरकार : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 महत्वाचे निर्णय

 

Related Posts