IMPIMP

National Commission for Safai Karamcharis | केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची सफाई कामगारांच्या मुलांच्या शाळेला भेट

by nagesh
 National Commission for Safai Karamcharis | Visit of the members of the Central Safai Karma Commission to the school of the children of the scavengers

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- National Commission for Safai Karamcharis | केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी. वावा (Dr. P.P. Vava) यांनी येरवडा (Pune Yerwada News) येथील सफाई कामगारांच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळेस भेट देऊन शाळेचा परिसर, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक लॅब, निवास व्यवस्था, भोजनगृह, खेळाचे मैदान तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सोयी सुविधांची माहिती घेतली. शाळेतील सुविधांविषयी समाधान व्यक्त करून शाळेला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी सांगितले. (National Commission for Safai Karamcharis)

 

वावा हे आयोगाच्या कामकाजासाठी पुणे दौऱ्यावर आले असून प्रारंभी बार्टी (BARTI) संस्थेचे महासंचालक सुनिल वारे
(Sunil Ware) यांनी त्यांची शासकीय विश्रामगृह पुणे येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना भारतीय राज्यघटनेची प्रत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्रमय चरित्र हा ग्रंथ भेट देऊन सन्मानित केले. (National Commission for Safai Karamcharis)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बार्टी संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, ‘घर घर संविधान’ उपक्रम आदींची
माहिती दिली. बार्टी द्वारा संचलित येरवडा येथील निवासी शाळेत सफाई कामगारांच्या मुलांच्या सर्वांगीण
विकासासाठी नाविन्यपूर्ण शालेय उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती वारे यांनी दिली.

 

बार्टी संस्थेच्या निबंधक इंदिरा अस्वार यांच्या हस्ते आयोगाच्या सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका जयश्री चेंडके (Head Master Jayashree Chendke),
प्रकल्प व्यवस्थापक नितिन सहारे (Project Manager Nitin Sahare),
शाळेतील शिक्षक व कर्मचारी सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

Web Title :- National Commission for Safai Karamcharis | Visit of the members of the Central Safai Karma Commission to the school of the children of the scavengers

 

हे देखील वाचा :

Jal Jeevan Mission Maharashtra | ‘जल जीवन मिशन’अंतर्गतची कामे मिशन मोडवर पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Maharashtra Cabinet Decision | महाराष्ट्र सरकार : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 महत्वाचे निर्णय

Entertainment Tax | करमणूक शुल्क आकारणीमध्ये सूट देण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा; अजित वाडेकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !!

 

Related Posts