IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : येरवडा पोलिस स्टेशन – नाना गायकवाड याच्यावर हल्ला करणार्‍या कैद्यावर येरवडा कारागृहात हल्ला; तशाच पद्धतीने केला हल्ला

by nagesh
Yerwada Jail News | Yerwada Jail beating the gang's cry! Another gang's goon was hit in the head

 

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | विविध गुन्ह्यांसह मोक्का कारवाई (MCOCA) Mokka करण्यात आलेल्या नाना गायकवाड
(Nana Gaikwad) याच्यावर हल्ला करणार्‍या कैद्यावर चौघा कैद्यांनी त्याच प्रमाणे हल्ला करुन गंभीर जखमी केले. (Pune Crime News)

 

सुरेश बळीराम दयाळू असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. सुरेश याने ज्या पद्धतीने पत्र्याच्या तुकड्याने हल्ला केला होता, तसाच पत्र्याच्या तुकड्याने
त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी तुरुंगाधिकारी रेवणनाथ कानडे (Jailor Revanath Kande) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये (Yerawada Police Station) फिर्याद (गु.
रजि. नं. २८४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अस्लम बशीर मुजावर (Aslam Bashir Mujawar), सिद्धार्थ अंकुश यमपुरे (Siddharth Ankush
Yampure), अजय विजय पायगुडे (Ajay Vijay Paigude), सौरभ गणेश सावळे (Saurabh Ganesh Sawale) या न्यायालयीन बंदीविरुद्ध गुन्हा
दाखल केला आहे. ही घटना येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) टिळक मंडल कार्यालयाच्या मुख्य फाटकाजवळ मंगळवारी दुपारी एक
वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध येथील नाना गायकवाड याच्यावर खंडणी (Extortion Case), जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याचे अनेक गुन्हे असून त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. सध्या तो कारागृहात असताना ३ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास नाना गायकवाड खोलीसमोर खुर्चीवर बसले होते. त्यावेळी सुरेश दयाळु याने लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने गायकवाड याच्या उजव्या गालावर वार केला होता. येरवडा पोलिसांनी सुरेश दयाळु याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

अस्लम मुजावर याच्याबरोबर सुरेश दयाळु याची पूर्वी भांडणे झाली होती. मुजावर इतर आरोपींवर खून, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.
मुजावर याने इतर आरोपींशी संगनमत करुन सुरेश याला हाताने धक्काबुक्की केली. बशीर मुजावर याने भत्ता पेटीच्या तुटलेल्या पत्र्याच्या तुकड्याने सुरेश याला मारहाण करुन जखमी केले.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Yerwada Police Station – Attack on inmate who assaulted Nana Gaikwad in Yerwada Jail; Attacked in the same manner

 

हे देखील वाचा :

Vandaniya Balasaheb Thackeray Aapla Dawakhana | गरिबांसाठी आपला दवाखाना उपयुक्त ठरेल – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

Pune PMC News | बोपोडी- सांगवी दरम्यानच्या मुळा नदीवरील पुलाचा निम्मा खर्च पुणे महापालिका करणार; पिंपरी चिंचवड महापालिकेला कामाचे 18.13 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Aswani Cricket Cup | पिंपरी इंडियन्स, मंगतानी टायटन्सची विजयी सलामी; आसवानी क्रिकेट कप

स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन; पिंपरीमध्ये २२ मेपर्यंत रंगणार स्पर्धा

 

Related Posts