IMPIMP

Pune Crime News | कोरोना, लॉकडाऊनपासून बंद पडलेल्या पण आता सुरू झालेल्या ‘एमओबी’मध्ये 20 गुन्हेगारांची ‘परेड’

by nagesh
 Pune Crime News | Pune Police MOB Meeting In CP Office

32 पोलिस ठाण्यातील अन् गुन्हे शाखेतील अधिकारी, अंमलदारांसह 200 जणांची उपस्थिती

 

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | कोरोना व्हायरल आणि लॉकडाऊन पासून म्हणजेच जवळपास डिसेंबर 2019 पासुन बंद पडलेली एमओबी मिटींग (Pune Police MOB Metting) मंगळवार (दि. 7 फेब्रुवारी) पासुन पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयातील कॉप्स एक्सलन्स हॉल क्रमांक 1 मध्ये पार पडलेल्या या मिटींगमध्ये शरीराविरूध्द व मालाविरूध्दच्या गुन्हयातील अटकेत असलेल्या 20 गुन्हेगारांची ‘परेड’ झाली. बैठकीस 44 पोलिस निरीक्षकांसह 150 पोलिस अंमलदार उपस्थित होते. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त – 1 सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांनी एमओबी मिटींगमध्ये सूचना दिल्या. गेल्या 2-3 वर्षापासून बंद पडलेली एमओबी मिटींग पुन्हा सुरू झाल्यामुळे गुन्हेगार, त्यांची कार्यपध्दती आणि इतर गोष्टीचे अदान-प्रदान होवून गुन्हयांना प्रतिबंध करण्यास मोठी मदत होणार आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik) आणि गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale) यांनी पुढाकार घेत गेल्या काही वर्षापासून बंद पडलेली एमओबी मिटींग पुन्हा सुरू करण्यास सांगितले होते. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बैठकीस शहरातील 32 पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे (डीबी) आणि सर्व्हेलन्स पथकाचे अधिकारी आणि अंमलदार तसेच गुन्हे शाखेतील सर्व संबंधित अधिकारी आणि प्रत्येक युनिट व पथकातील 5 पोलिस अंमलदार उपस्थित होते. बैठकीमध्ये सध्या अटकेत असलेल्या 20 गुन्हेगारांची ‘परेड’ झाली. त्यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांनी गुन्हेगारास अटक झाल्यानंतर त्याच्या बाबतची कोण-कोणतील माहिती संकलित करावी, त्याचे संपुर्ण रेकॉर्ड तयार करण्याबाबत सचुना दिल्या. अटकेतील गुन्हेगाराने यापुर्वी कोण-कोणत्या पध्दतीचे गुन्हे केले आहेत याची तपासणी करावी तसेच त्याबाबतचा अहवाल तयार करावा असे सांगितले. ‘परेड’ झालेल्या 20 गुन्हेगारांवर असलेल्या गुन्हयाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला होता. (Pune Crime News)

 

मंगळवारी सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या दरम्यान बैठक पार पडली.
उपस्थित पोलिस अधिकार्‍यांनी ‘परेड’ झालेल्या सर्व गुन्हेगारांची माहिती संकलित करून ठेवली.
स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आप-आपसात गुन्हेगारांच्या माहितीचे ‘अदान-प्रदान’ केले.
बंद पडलेली एमओबी मिटींग पुन्हा सुरू झालेलं गुन्हेगारांच्या कार्यपध्दती,
त्यांच्या सवयी आणि लक्षणांची देवाण-घेवणा होवून गुन्हे घडण्यापासून रोखण्यास तसेच गुन्हे घडल्यानंतर
त्याचा पर्दाफाश करण्यात मोठी मदत होते. (Pune Police News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Police MOB Meeting In CP Office

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केल्यावर अजित पवार यांना राजीनाम्याविषयी बोलले बाळासाहेब थोरात; म्हणाले…

Pune Crime News | औंध परिसरात अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर जमावाकडून हल्ला, 50 ते 60 हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडले

Maharashtra Politics | रायगड जिल्ह्यात ‘शेकाप’ला मोठा धक्का; माजी जिल्हा परिषद सदस्याचा भाजपमध्ये प्रवेश

 

Related Posts