IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : समर्थ पोलिस स्टेशन – गरम होत असल्याने बाहेर बसलेल्या तरुणाच्या डोक्यात घातली बिअरची बाटली

by nagesh
Pune Crime News | Samarth Police Station - As it was getting hot, a beer bottle was placed on the head of a youth sitting outside

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | घरात गरम होत असल्याने बाहेर बसलेल्या तरुणाशी झालेल्या वादातून चौघांनी त्याच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जबर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (वय २८, रा. भाजी मंडई, समाधान चौक, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ऋषभ देवधर आंदेकर Rishabh Deodhar Andekar (रा. आनंद सोसायटी, नाना पेठ), आदित्य अमर उकरंडे Aditya Amar Ukarande (रा. नाना पेठ), लक्षा आणि त्याचा मित्र अशा चौघांवर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. ही घटना नाना पेठेतील भाजी मंडईत सोमवारी पहाटे १ वाजता घडली. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरात गरम होत असल्याचे घरा बाहेर बसले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचे आरोपी तेथे आले. व दम देत बाहेर का बसला आहेस आतमध्ये जा, असे बोलले. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना गरम होत आहे म्हणून बसलो आहे. तुम्हाला काय करायचे आहे. तुम्ही तुमचे काम करा असे सांगितले. त्याचा राग येऊन त्यांनी शिवीगाळ करुन दगड फेकून मारला. लक्षा याने त्याच्या हातातील बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारली. ती डोळ्याजवळ भुवईवर लागून फिर्यादी हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Samarth Police Station – As it was getting hot, a beer bottle
was placed on the head of a youth sitting outside

हे देखील वाचा

Swati Sharad Mohol | छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वारद फाऊंडेशनच्या स्वाती शरद मोहोळ यांच्याकडून महिलांसाठी शौर्यपीठ धर्मपीठ तुळापूर सहलीचे आयोजन

Maharashtra Politics News | राष्ट्रवादीला पुण्यातून पहिला धक्का, शरद पवारांचा खास शिलेदार भाजपात जाणार

Pune Pimpri Chinchwad Police News | ‘फ्री पास’बाबत खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या गंभीर
आरोपानंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून संबंधितावर कडक कारवाई

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – मुलीच्या वडिलांनी धमकीला घाबरुन केली आत्महत्या

Related Posts