IMPIMP

Pune Crime News | स्वारगेट पोलिस स्टेशन : तंबाखु व्यावसायिकावर गोळीबार करुन 4 लाख लुटले; गणेश कला क्रीडा मंचाजवळील रोडवर ‘थरार’

by nagesh
Pune Crime News | swargate police station 4 lakh looted after firing on tobacconist thrill on road near ganesh kala krida mancha

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | दुचाकीवरुन जाणार्‍या तंबाखु व्यावसायिकावर (Tobacco Professional) मोटारसायकलवरुन आलेल्या हल्लेखोरांनी एका पाठोपाठ दोन गोळ्या झाडून (Pune Firing News) जखमी केले. त्यांच्याकडील ४ लाख रुपयांची बॅग जबरदस्तीने चोरुन नेली. ही घटना गणेश कला क्रीडा मंचाजवळील (Ganesh Kala Krida Mancha) डायमंड हॉटेलसमोरील (Diamond Hotel) रोडवर बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

लतेश हसमुखलाल सुरतवाला (वय ५१, रा. माणिकबाग) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीत आणि माडीत गोळी घुसली होती. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लतेश सुरतवाला यांचा नाना पेठेत तंबाखुचा व्यवसाय आहे. व्यवसायातील जमलेले चार लाख रुपये एका बॅगेत ठेवून ते दुचाकीवरुन घरी निघाले होते. त्यांचा नोकरही बरोबर होता. रात्री नऊ ते सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ते गणेश कला क्रीडा जवळील रोडवरुन माणिकबागला घरी जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्यांनी त्यांच्यावर गोळीबार (Firing In Pune) केला. त्यातील एक गोळी त्यांच्या पाठीत तर दुसरी मांडीत शिरली. ते तेथेच कोसळले. त्यांच्याकडील ४ लाख रुपयांची बॅग घेऊन चोरटे पळून गेले. ही घटना समजताच पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांना तेथे दोन पुंगळ्या आढळून आल्या. स्वारगेट पोलीस (Swargate Police Station) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | swargate police station 4 lakh looted after firing on tobacconist thrill on
road near ganesh kala krida mancha

हे देखील वाचा

Related Posts