IMPIMP

Pune Crime News | सराईत गुन्हेगाराला MPDA कायद्यान्वये केले स्थानबद्ध; पोलीस आयुक्त रितेशकुमार यांची 33 वी स्थानबद्धतेची कारवाई

by nagesh
Pune Crime News | the innkeeper is booked under the mpda act 33rd posting action of police commissioner ritesh kumar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth), कात्रज परिसरात (Katraj Area) दहशत निर्माण करणार्‍या गुन्हेगारावर पोलीस आयुक्त रितेशकुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) कारवाई करुन त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

चंद्रकांत रामदास माने Chandrakant Ramdas Mane (वय 21, रा. आंबेगाव खुर्द) असे या सराईत गुन्हेगाराचे (Criminal On Pune Police Records) नाव आहे.

चंद्रकांत माने याने त्याच्या साथीदारासह सिंहगड रोड, भारती विद्यापीठ परिसरात लोखंडी कोयत्यासारखे हत्याराने खूनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबर दुखापत करणे, हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षात त्याच्याविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नाही.

याबाबत एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumhar),
पीसीबीचे (Pune Police Crime Branch) वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे (Sr PI Chandrakant Bedre)
यांनी पाठविला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी त्याची पडताळणी करुन चंद्रकांत माने याला अमरावती कारागृहात
(Amravati Jail) एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. पोलीस आयुक्तांनी कार्यभार स्वीकारल्यानंतरची ही 33 वी कारवाई आहे.

 

Web Title : Pune Crime News | the innkeeper is booked under the mpda act 33rd posting action of
police commissioner ritesh kumar


हे देखील वाचा

 

Related Posts