IMPIMP

Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
 Pune Crime | The crime branch arrested the criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन येरवडा परिसरात आलेल्या एकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे
शाखा युनिट दोनने (Pune Police Crime Branch Unit 2) अटक केली आहे. ही कारवाई (Pune Crime) सोमवारी (दि.30) सादलबाबा दर्ग्याजवळ
सापळा रचून करण्यात आली. राहुल रामनरेश गुप्ता (वय-28 रा. विमाननगर, पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अंमलदार मोहसीन शेख व संजय जाधव यांना माहिती मिळाली, की बंडगार्डन पोलीस ठाण्यातील (Bund Garden Police Station) तडीपार गुन्हेगार राहुल गुप्ता हा सादलबाबा दर्गा येथे दर्शनासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) आयपीसी 142, आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा दाखल करुन येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपी कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Kranti Kumar Patil),
पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble), पोलीस अंमलदार निखिल जाधव,
मोहसीन शेख, संजय जादव, उज्ज्वल मोकाशी, नागनाथ राख यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | The crime branch arrested the criminal

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | चार्टर्ड अकाउंटंट यांना कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन 30 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

Maharashtra Police Recruitment | SRPF गट क्र.५ दौंड येथील सशस्त्र पोलीस भरती ! लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध; आक्षेप नोंदवण्यास ३१ जानेवारीपर्यंतची मुदत

Pune Crime News | पुण्यात गुंडांचा उच्छाद सुरुच, येरवडा परिसरात टोळक्यांमध्ये राडा; बिअरच्या बाटल्या घरावर फेकत, कोयते हवेत फिरवून पसरवली दहशत

 

Related Posts