IMPIMP

Pune Lonavala Crime | लोणावळ्यात उच्च प्रतीचे विदेशी मद्य जप्त, राज्य उत्पादन विभागाची कारवाई

by sachinsitapure
Maharashtra State Excise Department

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Lonavala Crime | उच्च प्रतीचे विदेशी मद्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे भरारी पथक क्रमांक एकच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेऊन वाहनासह 23 लाख 15 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.6) लोणावळा शहर हद्दीतील तुंगार्ली येथील गोल्ड व्हॅली रोडवरील द लगुना रिसॉर्टच्या जवळ करण्यात आली आहे. (Maharashtra State Excise Department)

बापु विठ्ठल आहेर व सुनिल रामचंद्र कदम यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. लोणावळा शहर हद्दीत अवैधपणे उच्च प्रतीचे विदेशी मद्य बाळगुन विक्री करण्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती पुणे भरारी पथक क्रमांक एकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तुंगार्ली येथे एक वाहन (एमएच 43 सी सी 9267) अडवून तपासणी केली.पथकाने वाहनाची तपासणी केली असता उच्च प्रतीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या 50 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. पथकाने वाहनासह मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

ही कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक (दक्षता व अंमलबजावणी) प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त पुणे विभाग धोमकर, अधीक्षक चरणसिंग राजपुत, उपअधीक्षक सुजित पाटील, उत्तम शिंदे, एस.बी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक एकचे निरीक्षक देवदत्त पोटे, बी विभागाचे दुय्यम निरीक्षक बी.एस. घुगे, डी.एस. सुर्यवंशी तसेच जवान सुरज घुले, जयराम काचरा, शाहिन इनामदार, मुकूंद पोटे, चंद्रकांत नाईक, शरद हांडगर यांच्या पथकाने केली.

Related Posts