IMPIMP

Pune News | मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात मुस्लिम संघटनांचा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

by nagesh
Pune News | Muslim organizations hold agitation at District Collector's office on Wednesday against the action taken against Maulana Kalim Siddiqui

पुणे : (बासित शेख ) : सरकारसत्ता ऑनलाइन   Pune News | अरबी भाषेचे तज्ञ मौलाना कलीम सिद्दिकी यांच्यावर धर्मप्रचाराचे खोटे आरोप करुन त्यांच्यावर उत्तर प्रदेश सरकारने गुन्हे दाखल केले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने जाणीवपूर्वक मुस्लिम जनसमुदायाविरोधात द्वेष भावनेने व समाजामध्ये दहशत पसरविण्याच्या हेतूने मौलानांवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी दुपारी ३ वाजता मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले (Pune News) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुण्यातील (Pune News) कुल जमाती तंजीम या संस्थेच्या माध्यमातून पुणे शहर व जिल्ह्यातील २५ हून अधिक संस्था, संघटना यांनी एकत्र येऊन २३
सप्टेंबर रोजी विचार विनिमय केला.
त्यात प्रामुख्याने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमियत उलेमा ए हिंद (अर्शद मदनी) जमियत उमेला ए हिंद (महेमूद मदनी) पॉप्युलर फ्रंट ऑफ
इंडिया, ऑल इंडिया इमाम कौन्सिल,
पयामे इन्सानियत, जमात ए इस्लामी हिंद, अ‍ेआयएमआयएम, एसडीपीआय, उलेमा अ‍ॅक्शन कमिटी, कुल जमाती तंजीम चिंचवड, कुल जमाती तंजीम,
खडकी, दि मुस्लिम फाऊंडेशन,
रोशन फाऊंडेशन, जमात अहेल हदिस हिंद, मिल्लत फाऊंडेशन, महाराष्ट्र अ‍ॅक्शन कमिटी, सिरत कमिटी इत्यादी सहभागी झाले होते.

मौलाना कलीम सिद्दिकी यांना उत्तर प्रदेश सरकारने २२ सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन तुरुंगात टाकले आहे.
यापूर्वीही उत्तर प्रदेश पोलिसांनी मुफ्ती जहांगीर व मौलाना उमर गौतम यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात डांबलेले आहे.
उत्तर प्रदेश सरकारने जाणीवपूर्वक मुस्लिम जनसमुदायाविरुद्ध द्वेषभावनेने व समाजामध्ये दहशत पसरविण्याच्या हेतूने मोलानांवर कारवाई सत्र सुरु केले आहे.

 

देशभरातून अशा खोट्या कारवाईविरुद्ध जनमत तयार होत आहे. त्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे
धरुन या घटनेचा निषेध करण्यात येणार आहे.
तसेच सर्व मौलानांची त्वरीत निर्दोष मुक्तता करण्याची मागणी करण्यात येणार आहे, असे कुल जमाती तंजीमतर्फे सांगण्यात आले.

 

Web Title : Pune News | Muslim organizations hold agitation at District Collector’s office on Wednesday against the action taken against Maulana Kalim Siddiqui

 

हे देखील वाचा :

ना 12 महिन्यांचे वेटिंग ना 12 लाखांची आवश्यकता, निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा Mahindra Thar, कंपनी देईल गॅरंटी आणि वॉरंटी प्लान

Pune Crime | ग्राहकांनो गॅस मोजूनच घ्या ! घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून घेणारी टोळी गजाआड; 9 जणांना अटक 2 फरार

Pune Crime | ‘कात्रजचा खून झाला !’ पुण्यात झळकला ‘फ्लेक्स’; उलट-सुलट चर्चेला ‘उधाण’

 

Related Posts