IMPIMP

Pune News | पुण्यात या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद; सिंगल डिजिट किमान Temp

by nagesh
Pune News | Pune recorded the lowest temperature of the season; Single digit minimum Temp

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | दक्षिणेत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ऐन दिवाळीत पाऊस पडला असताना आता उत्तरपूर्वेकडील वार्‍यांचा जोर वाढल्याने गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. या हंगामात प्रथम पुण्यातील (Pune News) तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली गेला आहे. अचानक तापमानात घट (Winter) झाल्याने सकाळी फिरायला जाणार्‍यांनी स्वेटर, मफलर, हातमोजे बाहेर काढलेले दिसून येत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुणे शहरात (Pune News) बुधवारी किमान तापमान ११.८ अशं सेल्सिअसची नोंद झाली होती. त्यात आज आणखी घट झाली. पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि हवेली येथे ९.७ अंश सेल्सिअस आणि एनडीए हे आज सकाळी ९.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचवेळी पाषाण येथे १०.२, शिवाजीनगर येथे १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या हंगामात प्रथम पुणे जिल्ह्यात (Pune News) सिंगल डिजिट किमान तापमानाची नोंद झाली आहे.

या हंगामातील आतापर्यंतचे हे निच्चांकी किमान तापमान ठरले आहे. गेल्या वर्षी शिवाजीनगर येथे १२ नोव्हेबर २०२० रोजी ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.

२७ नोव्हेबर २०१६ रोजी ९.३

१७ नोव्हेबर २०१४ रोजी ९.९

१९ नोव्हेबर २०१३ रोजी ७.९

तसेच २७ नोव्हेबर १९६४ रोजी पुण्यातील नोव्हेबर महिन्यातील सर्वात निच्चांकी ४.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद यापूर्वी झाली आहे.

 

Web Title: Pune News | Pune recorded the lowest temperature of the season; Single digit minimum Temp

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 25 वर्षीय ‘सारिका’नं दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या 30 वर्षाच्या तरुणाशी केलं लग्न ! एकेदिवशी दाखवलं सर्वांनाच ‘काम’, पुण्यात ‘हे’ कृत्य केल्यानं 5 जण ‘गोत्यात’

Multibagger Stock | शेयर बाजारात ‘बूम’, ‘या’ पेनी स्टॉकने वर्षभरात 1 लाखाचे केले 18 लाख!

Pune Crime | ज्येष्ठ नागरिकास सव्वा कोटी रुपयांचा गंडा; दत्तवाडी पोलिसांकडून बांधकाम व्यावसायिक हेमंत मराठेला अटक

 

Related Posts