IMPIMP

Pune News | संतांची जयंती, पुण्यतिथी शासकीयस्तरावर साजरी करावी; वारकरी सांप्रदायाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

by nagesh
Pune News | Saints' birthdays and anniversaries should be celebrated at the government level; Statement of Warkari Sampradaya to the Chief Minister

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune News | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. संत तुकाराम महाराज, श्री. संत एकनाथ महाराज व श्री. संत नामदेव महाराज या चार संतांचा शासनाच्या महापुरुषांच्या शासकीय अभिवादन यादीत समावेश करावा व त्यांची जयंती व पुण्यतिथी सोहळे दरवर्षी शासनातर्फे शासन स्तरावर साजरे करावेत अशी मागणी समस्त वारकरी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Pune News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वारकरी सांप्रदायातील ह. भ. प. राजाभाऊ थोरात, ह भ. प.एकनाथ महाराज हांडे, कृषी महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लोंढे यांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून मागण्याचे निवेदन दिले . (Pune News)

 

या निवेदनात श्री. संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान हे जगाच्या कल्याणाकरिता आहे. तरी या पसायदानास ‘विश्वप्रार्थना” म्हणून मान्यता मिळावी, यासाठी आपण तसा ठराव महाराष्ट्र शासनातर्फे भारत सरकारकडे पाठवावा. यासाठीचा पाठपुरावा आपल्या सरकारकडून व्हावा . श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर राजकीय व्यक्तींऐवजी सर्व समितीवर वारकरी संप्रदायातील व्यक्तींची निवड करण्यात यावी. अध्यक्ष व सह-अध्यक्ष वारकरी संप्रदायाचा असावा. कारण श्री विठ्ठलाचे नित्योपचार, रुढी, परंपरा यासंबंधीची माहिती वारकरी संप्रदायातील व्यक्तींना, महाराज मंडळींना माहिती आहे. वारी काळात होणारे अपघात, त्यात मृत्यू पावलेल्या वारकरी व भाविकांना दहा लाख रुपये (१० लाख रुपये) शासनातर्फे मदत मिळावी. गंभीर जखमी व जखमी झालेल्या वारकऱ्यांचा खर्च शासनाने करावा तसेच त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात यावे.

 

महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायातर्फे अनेक उत्सव, वारी , सोहळे, पायी दिंडया या संतांच्या जन्मगावी जात असतात.
त्यांना येणाऱ्या अडीअडचणी, परवानगीसाठी, मदतीसाठी, नियोजनासाठी शासन दरबारी कायमस्वरुपी शासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी.
त्याद्वारे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवता येतील. वरील मागण्यांबाबत मागील सरकारच्या काळात वेळोवेळी पाठपुरावा करुन सुध्दा सदर मागण्यांची पूर्तता झालेली नाही.
तरी आपण स्वतः यात लक्ष घालून सदर मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी वारकरी सांप्रदायाच्या वतीने करण्यात आली आहे .

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune News | Saints’ birthdays and anniversaries should be celebrated at the government level; Statement of Warkari Sampradaya to the Chief Minister

 

हे देखील वाचा :

Deepak Kesarkar | शिवसेना प्रत्येकवेळी शरद पवारांमुळे फुटली, दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप

Fasting and Diabetes | डायबिटीजचे रूग्ण उपवास करत असतील तर ‘या’ 5 गोष्टी आवश्य ठेवा लक्षात, ब्लड शुगर राहील कंट्रोल

Triple Negative Breast Cancer | ‘या’ घातक कॅन्सरपासून वाचवू शकते तुमच्या स्वयंपाक घरात ठेवलेली ‘ही’ एक छोटी वस्तू, शास्त्रज्ञांनी सुद्धा केले मान्य

 

Related Posts