IMPIMP

Pune News | पुण्याच्या मोहम्मदवाडीत भरदिवसा झाडे उखडून टाकण्याचा प्रकार; समाजकंटकांविरुद्ध कारवाईची नागरिकांची मागणी

by nagesh
Pune News | The practice of uprooting trees all day in Mohammadwadi, Pune; Citizens demand action against anti-social elements

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | मोहम्मदवाडी येथील मिथुन सोसायटीच्या बाहेरील बाजूला सार्वजनिक भुखंडावर वृक्षारोपण करण्यात आले होते. वृक्षारोपण करण्यात आलेली ही झाडे भरदिवसा उखडून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समजताच मिथुन सोसायटीतील रहिवासी शुक्रवारी सकाळी रस्त्यावर आले. त्यांनी ही झाडे तोडून टाकणार्‍या समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली (Pune News) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबतची माहिती अशी, मोहम्मदवाडी (mohammadwadi pune) येथील मिथुन सोसायटीच्या (mithun society) बाहेरील बाजूला मोकळी जागा
आहे. तेथे अनेकदा गुन्हेगारी कारवायांसाठी टोळके जमतात. त्यांना रोखण्यासाठी रहिवाशांनी काही महिन्यांपूर्वी वृक्षारोपण केले होते. ही झाडे चांगली 7 फुटापर्यंत वाढली होती. एका टेम्पोतून चार ते पाच जण आले. त्यांनी मोकळ्या भूखंडावर वृक्षारोपण केलेली झाडे एका पाठोपाठ उपटून (Pune News) टाकली.

 

ही जागा बळकाविण्याचा काही समाजकंटकांचा प्रयत्न असावा. त्यातूनच जर ही झाडे मोठी वाढली तर जागा बळकाविण्यात अडचण येईल, यामुळे वृक्षारोपण केलेली ही झाडे तोडून टाकली असावी, असे येथील रहिवाशांना वाटत आहे. ज्या 4 ते 5 जणांनी ही झाडे तोडून टाकली, त्यांचे फोटो रहिवाशांनी काढले असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी रहिवाशांची मागणी आहे.

 

Web Title :- Pune News | The practice of uprooting trees all day in Mohammadwadi, Pune; Citizens demand action against anti-social elements

 

हे देखील वाचा :

3rd wave of covid in india | ऑनलाइन साजरा करा सण, 3 महिन्यांपर्यंत निष्काळजीपणा पडू शकतो महागात – केंद्राचा सल्ला

Pune Crime | पुण्यातील प्रसिध्द ज्वेलर्सकडे ED व SFIO च्या नावाने 50 लाखाच्या खंडणीची मागणी; रूपेश चौधरी, अमित मिरचंदाणी यांच्यासह 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल

Pune Crime | 21 वर्षीय महिलेचं पतीच्या मित्राशी ‘जुळलं’, पत्नीनं त्याच्याशी ‘झेंगाट’ असल्याचं नवर्‍याला सांगितलं, नंतर ‘लफडं’ पोलिसांपर्यंत गेलं

 

Related Posts